मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nawab Malik : नबाब मलिकांना कोर्टाचा मोठा दणका, कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ
Nawab Malik NCP
Nawab Malik NCP (HT_PRINT)

Nawab Malik : नबाब मलिकांना कोर्टाचा मोठा दणका, कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ

22 February 2023, 13:43 ISTAtik Sikandar Shaikh

Nawab Malik NCP : नवाब मलिक यांची एक किडनी निकामी झाली असून रुग्णालयातून त्यांना तातडीनं डिस्चार्ज मिळवण्यासाठी ईडी प्रयत्न करत असल्याचा दावा मलिकांच्या वकिलांनी केला आहे.

Nawab Malik NCP : मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी केल्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना कोर्टानं जामीन देण्यास पुन्हा नकार दिला आहे. ईडीनं मलिकांच्या जामिनास विरोध केल्यानंतर कोर्टानं त्यांच्या कोठडीत १४ दिवसांची आणखी वाढ केली आहे. त्यामुळं आता नवाब मलिकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. त्यानंतर आता हायकोर्टानंही मलिकांची कोठडी कायम ठेवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईच्या कुर्ला भागातील दाऊदच्या हस्तकांकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी संपत्ती खरेदी केल्याचा आरोप ईडीनं त्यांच्यावर ठेवला आहे. २० वर्षांपूर्वी दाऊद इब्राहिमच्या हस्तक, त्याची बहिण हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांनी मूळ मालकाला धमकावून त्या जमिनीचा व्यवहार केला होता, असं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. नवाब मलिकांनी जमीन खरेदी करताना आधीच्या व्यवहारांची कोणतीही पडताळणी केलेली नव्हती, असाही आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. त्यामुळं आता कोर्टानं नवाब मलिकांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मलिक जामीनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

नवाब मलिकांची किडनी निकामी- देसाई

गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांची एक किडनी निकामी झालेली आहे. सध्या त्यांचं शरीर एकाच किडनीवर काम करत आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना ईडीकडून त्यांच्या डिस्चार्जसाठी घाई केली जात असल्याचा दावा मलिकांचे वकील अमित देसाई यांनी केला होता. नवाब मलिक हे सध्या कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयामध्ये उपचार घेत असून त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांना उपचारासाठी दुसऱ्या मोठ्या रुग्णालयातही दाखल करण्यात येऊ शकतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.