Faraz Malik son booked : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्याविरोधात कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कुर्ला पीएस येथे व्हिसा अर्जासाठी बनावट कागदपत्रे दिल्याचा आरोप आहे. एनएनआय वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे.
फराज मलिकने त्याची दुसरी पत्नी हमलीन फ्रान्सची नागरिक आहे. तिच्या व्हीसासाठी फराजने बनावट कागदपत्रे तयार केल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. फराजविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरच्या माध्यमातून फराज मलिकवर टीकास्त्र सोडलंय. "दुसऱ्यांना 'फर्जीवाडा' म्हणणारे स्वतः किती 'फर्जी'आहेत हे दिसून येत आहे. फ्रान्समध्ये रहाणाऱ्या पत्नीचा व्हीसा बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार केला. म्हणूनच मंत्री मलिक यांचे पुत्र फराज यांच्याविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे",अशा आशयाचे ट्विट कंबोज यांनी केले आहे.