Rupali Thombre News: शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाळी ठोंबरेंच्या अंगलट आले.रुपाली ठोंबरेंसह ७ जणांविरोधात बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून जितेंद्र आव्हाड यांचे व्हॉट्सअॅप चॅटचे फोटो पोस्ट केले. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात गु्न्हा दाखल केला. रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेले चॅट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत जितेंद्र आव्हाड कशाप्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न रुपाली ठोंबरे करत असल्याचे आव्हाडांनी तक्रारीमध्ये म्हटले.याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्यासह विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, विभीषण अघाव, आकाश चौरे आणि सौरभ आघाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकतेच जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. यात जितेंद्र आव्हाड म्हणाले की,'माझा खोटा व्हॉट्सअॅप चॅटचा व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध काल रात्री मी बीडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही और डर कशाला? हा व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा आहे, याची संपूर्ण माहाती मी ट्वीटद्वारे दिली आहे. त्याचा वापर केला तर पोलिसांना चौकशी सुरू आहे, हे सांगण्याचे कारणच उरणार नाही. मी स्वतःच सर्व तांत्रिक बाबी माझ्या ट्वीटमध्ये सांगितलेल्या माहितीचा वापर केला तर, पोलिसांना फक्त कारवाई करायची आहे.'
उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज..मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे... मुंडेंविरोधात आणि वाल्या (वाल्मिक कराड) विरोधात जे जे असेल सर्व गोळा कर... पैसे लागले तर, मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव...तुझा फोन लागत नाहीय सकाळपासून प्रयत्न करतोय...मोर्च्यात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशांची काळजी करु नका...आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्याला ही संधी द्यावी, मी सांगितलं आहे, कसं काय कुणावर बोलायचं...कसा मंत्री राहतो आणि अजित (अजित पवार) याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता, ही व्हॉट्सअप चॅट रुपाली ठोंबरे यांनी माध्यमांसमोर वाचून दाखवली.
संबंधित बातम्या