मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्रात ऑनलाइन रमीवर बंदी घालण्याची मागणी; राष्ट्रवादीनं केलं २१ कलाकारांना लक्ष्य

महाराष्ट्रात ऑनलाइन रमीवर बंदी घालण्याची मागणी; राष्ट्रवादीनं केलं २१ कलाकारांना लक्ष्य

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 27, 2023 02:24 PM IST

Online Rummy: ऑनलाईन रमीच्या माध्यमातून अधिकृपणे जुगार खेळला जात असून या गेमची जाहिरात करणाऱ्या कलाकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

Online Rummy
Online Rummy

Maharashtra: महाराष्ट्रात एखादी व्यक्ती जुगार खेळताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे प्राविधान आहे. परंतु, ऑनलाईन रमीच्या माध्यमातून अधिकृपणे जुगार खेळला जात आहे. दरम्यान, सिनेसृष्टीतील अनेक कलाकार ऑनलाईन गेमची जाहीरात करुन लोकांना रमी खेळण्यासाठी प्रवृत करत आहेत. अशी कलाकारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

"महाराष्ट्रात मटक्यासारख्या किंवा पत्ते खेळणार बंदी आहे. जर एखाद्या गावात किंवा एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचे पत्ते खेळताना आढळल्यास त्यांच्यावरची कठोर कारवाई करण्याचा प्राविधान आहे. मात्र, ऑनलाईन रमीतून सर्रास महाराष्ट्रात अवैध धंदा सुरू आहे. या धंद्याला आणखीन यशस्वी करण्यात मराठी चित्रपट कलाकार जाहिरात करून लोकांना रमी खेळण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. यामध्ये आघाडीचे मराठी कलाकार अंकुश चौधरी, अमेय वाघ, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, शिवाजी साटम, मनोज जोशी, शरद केळकर, श्रुती मराठे, उमेश कामात, संतोष जुवेकर, गौरी नलवडे, आणि अमृता खानविलकर यासारख्या कलाकारांची नावे आघाडीवर आहेत तर हिंदीतील अभिनेते ऋतिक रोशन, अन्नू कपूर, कुमार सानू, शक्ती कपूर, आलोक नाथ रजा मुरदअनुप सोनी, मनोज वाजपेय, अली अजगर, शिशिर शर्मा यांचा सामवेश आहे. तर दुसरीकडे अशी सुद्धा मराठी आणि हिंदी नामांकित कलाकार आहेत की ज्यांनी समाजावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून दारू गुटखा व अशा प्रकारच्या कुठल्याही जाहिराती नाकारले आहेत ज्याने समाजाचं स्वास्थ खराब होईल. अशा अशा कलाकारांचा सुद्धा कौतुक आम्ही करतोच आहे. मात्र जी कलाकार नुसतं पैसे कमवण्याच्या उद्देशाने जर समाजाचं स्वस्त बिघडत असतील तर अशा कलाकारांवर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा होनेही महत्त्वाच आहे", असं बाबासाहेब पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

"कलाक्षेत्र आणि कलाकार हे समाजाचा प्रतिनिधित्व करतं असतात. आणि त्यांच्या कृतीवर लोक विश्वास ठेवून तशा प्रकारे वागण्याचा किंवा अनुकूरण करण्याचा प्रयत्न करत असतात मराठी कलाकारांनी आपल्या परिवारातल्या आई, वडील, भाऊ, बहीण अशा लोकांना रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित केले असते का? अशा प्रकारचा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे त्यांनी या विषयाकडे गंभीरतेने बघून महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना आणि परिवारांना देशोधडीला लावणाऱ्या या ऑनलाइन रम्मी जुगारावर आळा घालावा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या चित्रपट विभागाच्यावतीने आक्रमक भूमिका घेतल्या जाईल", असा इशाराही बाबासाहेब पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.

ऑनलाईन रमीची जाहीरात करणारे मराठी कलाकार-

अंकुश चौधरी, अमेय वाघ, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, शिवाजी साटम, मनोश जोशी, शरद केळकर, श्रुती मराठे, उमेश कामत, संतोष जुवेकर, गौरी नलवडे, अमृता खानविलकर.

ऑनलाईन रमीची जाहीरात करणारे हिंदी कलाकार-

ऋतिक रोशन, अन्नू कपूर, शक्ती कपूर, कुमार सानू, आलोक नाथ, रजा मुरदअनुप सोनी, मनोज वायपेय, अली अजगर, शिशिर शर्मा.

WhatsApp channel