Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची प्रकृती अचानक बिघडली, एअर ॲम्बुलन्सने पुण्याहून मुंबईला हलवले-ncp leader chhagan bhujbal hospitalised in mumbai after health deteriorated issue ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची प्रकृती अचानक बिघडली, एअर ॲम्बुलन्सने पुण्याहून मुंबईला हलवले

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची प्रकृती अचानक बिघडली, एअर ॲम्बुलन्सने पुण्याहून मुंबईला हलवले

Sep 26, 2024 08:42 PM IST

chhagan bhujbal hospitalised : मंत्री छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे त्यांना पुण्याहून विशेष विमानाने मुंबईत आणलं गेलं आणि मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

छगन भुजबळांची  प्रकृती अचानक बिघडली
छगन भुजबळांची  प्रकृती अचानक बिघडली

chhagan bhujbal health : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने  एअर ॲम्बुलन्सने पुण्याहून मुंबईला हलवण्यात आले. त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.

छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे त्यांना पुण्याहून विशेष विमानाने मुंबईत आणलं गेलं आणि मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  गेल्या २४ तासापासून भुजबळ यांना ताप आहे. ताप नियंत्रित होत नसल्याने तसेच घसा दुखणे, सांधे दुखणे सारख्या आरोग्याच्या समस्या आहेत. तब्येत खूप बिघडल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

मंत्री छगन भुजबळ आज पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी पुणे दौऱ्यावर होते. मात्र ताप आणि घशाचा संसर्ग असल्याने त्यांना अधिक त्रास जाणवू लागला. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांना पुणे येथून मुंबईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. छगन भुजबळांनी दोन दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांसोबत ई-ए-मिलाद हा सण साजरा केला होता.

यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही ते मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी अॅडमिट झाले होते. छगन भुजबळ यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे त्यावेळी उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. 

Whats_app_banner
विभाग