मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chhagan Bhujbal : अतिवृष्टीग्रस्तांना मदतीची सुबुद्धी शिंदे सरकारला देवो, भुजबळांचं बाप्पांकडे साकडं

Chhagan Bhujbal : अतिवृष्टीग्रस्तांना मदतीची सुबुद्धी शिंदे सरकारला देवो, भुजबळांचं बाप्पांकडे साकडं

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 31, 2022 03:58 PM IST

शिंदे सरकारला अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना विघ्नहर्त्याकडे केली असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हणत शिंदे सरकारच्या कामकाजावर बोट ठेवले आहे.

भुजबळांचं बाप्पांकडे साकडं
भुजबळांचं बाप्पांकडे साकडं

मुंबई – आज घरोघरी मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषी वातावरणात बाप्पाचे आगमन झाले. अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या घरीही गणेशाचे आगमन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी वर्षा निवासस्थानी गणपतीची स्थापना केली. अनेक नेत्यांनी बाप्पाकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. दरम्यान गणपतीच्या आगमनावेळी माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, शिंदे सरकारला अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना विघ्नहर्त्याकडे केली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही मोजक्या शब्दात शिंदे सरकारच्या कामकाजावर बोट ठेवले आहे. 

गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा देत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, अतिृष्टीमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची बुध्दी शिंदे सरकारला द्यावी, अशी प्रार्थना विघ्हर्त्याकडे केली आहे. शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल अशी आम्हाला आशा आहे. परंतु राज्यातील शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. मागील तीन वर्षांपासून देशासह राज्यात कोरोनाचे संकट होतं मात्र आता हे कमी झाल्याने मोठ्या धडाक्यात सण उत्सव साजरे होत आहेत. देशावरील आणि राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होण्यासाठीही आम्ही बाप्पाकडे साकडे घातले आहे. राज्यात कोरोनाच्या संकटानंतर राज्य हिताची कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षाही भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी व्यक्त केली.

राज्यातील नेत्यांच्या नाराजी विषयी विचारले असता भुजबळ म्हणाले कि, वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात, याचा अर्थ असा नाही की नेते पक्ष सोडून जातील. नेते नाराज असतात, कोणत्या पक्षात नेते नाराज नाहीत, शिंदे (Eknath shinde) गटात सुद्धा नेते नाराज आहेत. यामुळे हा नाराज झाला तो नाराज झाला. हा नेता त्यांच्या गाडीत बसला तो त्याच्या सोबत गेला याला काही महत्व देण्याची गरज नाही. 

IPL_Entry_Point