बाबा सिद्दिकींच्या हत्येसाठी चार शस्त्रांचा वापर, पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून आले रिव्हॉल्वर? काय म्हणाले पोलीस
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाबा सिद्दिकींच्या हत्येसाठी चार शस्त्रांचा वापर, पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून आले रिव्हॉल्वर? काय म्हणाले पोलीस

बाबा सिद्दिकींच्या हत्येसाठी चार शस्त्रांचा वापर, पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून आले रिव्हॉल्वर? काय म्हणाले पोलीस

Oct 25, 2024 11:53 PM IST

Baba Siddique Murder case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील त्यांचे आमदार-पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण (PTI)

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत तीन नव्हे तर चार शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या तपासात शुक्रवारी हा मोठा खुलासा करण्यात आला. पोलिसांनी चौथे हत्यारही जप्त केले असून ही शस्त्रे ड्रोनद्वारे पाकिस्तानातून भारतात पाठवण्यात आली होती का, याचा तपास सुरू आहे. या शस्त्रांची छायाचित्रेही राजस्थान पोलिसांना पाठवण्यात आली आहेत. 

बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्व येथील मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या प्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे, तर अनेक आरोपी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाचा रहिवासी गुरमेल बलजीत सिंग, उत्तर प्रदेशचा धर्मराज कश्यप आणि फरार आरोपी शिवकुमार गौतम या तिघांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. पुण्यातील रहिवासी प्रवीण लोणकरचा भाऊ शुभम हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित आहे. त्याने आणि इतर फरार आरोपींनी हत्येचा कट रचून हत्यारे पुरवली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गोळीबारापूर्वी तीन हल्लेखोरांनी सिद्दीकी यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर मिरचीपूड फेकली आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील भंगार व्यापारी हरिशकुमार निषाद हा या खून प्रकरणात आर्थिक मदत करत होता. मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि मुख्य आरोपी शुभम लोणकर आणि मोहम्मद झिशान अख्तर सध्या फरार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी झिशान अख्तर हा सर्व आरोपींच्या संपर्कात होता आणि त्यांना भरघोस पैसे आणि परदेश प्रवासाचे आश्वासन देत होता. राजस्थानमध्ये हत्येचा कट रचणाऱ्या बिश्नोई टोळीतील अन्य सात संशयित हल्लेखोरांनाही दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. गेल्या काही वर्षांत खून, खंडणी, शस्त्र तस्करी सारख्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या बिश्नोई टोळीचा प्रभाव सातत्याने वाढत आहे.

९ आरोपींची कोठडी उद्या संपणार -

दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील नऊ आरोपींच्या पोलिस कोठडीत मुंबई कोर्टाने २६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या तारखांना अटक करण्यात आलेल्या नऊ जणांची प्राथमिक कोठडी शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (एस्प्लेनेड कोर्ट) व्ही. आर. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याची मागणी केली, तर न्यायालयाने कोठडीत शनिवारपर्यंत एक दिवसाची वाढ केली. गुरमेल बलजीत सिंग (२३), धर्मराज कश्यप (२१), हरिशकुमार निसाड (२६), प्रवीण लोणकर (३०), नितीन गौतम सप्रे (३२), संभाजी किसन पारधी (४४), प्रदीप दत्तू ठोंबरे (३७), चेतन दिलीप पारधी आणि राम फुलचंद कनोजिया (४३) अशी आरोपींची नावे आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर