अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बारामतीमधून कोण लढणार?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बारामतीमधून कोण लढणार?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बारामतीमधून कोण लढणार?

Oct 23, 2024 01:38 PM IST

Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची ३८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अजित पवार हे बारामतीमधून लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बारामतीमधून कोण लढणार?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बारामतीमधून कोण लढणार?

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची व मनसेची यादी जाहीर झाल्यावर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ३८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. अजित पवार हे बारामतीमधूनच निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ येवून ठेपल्या आहेत. २० नोव्हेंबरला राज्यातील २८८ मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. तर महाराष्ट्र नव निर्माण सेनेने देखील उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीत अजित पवार हे बारामती येथून लढणार आहे. तर धनंजय मुंडे हे परळीतून, दिलीप वळसे पाटील हे आंबेगावमधून तर आशुतोष काळे हे कोपरगावमधून निवडणूक लढणार आहे. तर हसन मुश्रीफहे कागलमधून निवडणूक लढणार आहे. तर दत्तात्रय भरणे हे इंदापूर मधून निवडणूक लढणार आहे. अजित पवार यांच्यासोबत जे आले आहेत त्यांना संधी देण्यात आली आहे.

उमेदवारांची यादी

१. बारामती- अजित पवार

२. येवला- छगन भुजबळ

३. आंबेगाव- दिलीप वळसे-पाटील

४. कागल- हसन मुश्रीफ

५. परळी- धनंजय मुंडे

६. दिंडोरी-नरहरी झिरवाळ

७. अहेरी- धर्मराव बाबा आत्राम

८. श्रीवर्धन- आदिती तटकरे

९. अंमळनेर- अनिल भाईदास पाटील

१०. उदगीर- संजय बनसोडे

११. अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले

१२. माजलगाव- प्रकाश दादा सोळंके

१३. वाई- मकरंद पाटील

१४. सिन्नर- माणिकराव कोकाटे

१५. खेड आळंदी- दिलीप मोहिते

१६. अहमदनगर शहर- संग्राम जगताप

१७. इंदापूर- दत्तात्रय भरणे

१८. अहमदपूर- बाबासाहेच पाटील

१९. शहापूर- दौलत दरोडा

२०. पिंपरी- अण्णा बनसोडे

२१. कळवण- नितीन पवार

२२. कोपरगाव- आशुतोष काळे

२३. अकोले- किरण लहामटे

२४. बसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे

२५. चिपळूण- शेखर निकम

२६. मावळ- सुनील शेळके

२७. जुन्नर- अतुल बेनके

२८. मोहोळ -यशवंत विठ्ठल माने

२९. हडपसर- चेतन तुपे

३०. देवळाली- सरोज आहिरे

३१. चंदगड- राजेश पाटील

३२. इगतपुरी- हिरामण खोसकर

३३. तुमसर- राजू कारेमोरे

३४. पुसद- इंद्रनील नाईक

३५. अमरावती शहर- सुलभा खोडके

३६ नवापुर - भरत गावीत

३७. पाथरी - निर्मला विटेकर

३८. मुंब्रा-कळवा - नजीब मुल्ला

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर