Maharashtra Politics : अजित पवारांना पहिला दणका, आमदाराने सोडली साथ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics : अजित पवारांना पहिला दणका, आमदाराने सोडली साथ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश

Maharashtra Politics : अजित पवारांना पहिला दणका, आमदाराने सोडली साथ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश

Jul 27, 2024 06:13 PM IST

babajani Durrani : बाबाजानी दुर्राणीयांनी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश केला. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

बाबाजानी दुर्राणी यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
बाबाजानी दुर्राणी यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी अजित पवार गटातील वरिष्ठ नेते व आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शनिवारी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी यांची शुक्रवारी भेट झाली होती. बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी  शरद पवार गटाच्या बैठकीत सामील झाला होता.  त्याचबरोबर त्यांनी आपल्या वडिलांसाठी विधानसभेचे तिकीटही मागितली होते. त्यानंतर आज (शनिवार) बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश केला. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

शरद पवार गटात सामील झाल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटले की, शरद पवारांची साथ सोडण्यांची स्थिती काय झाली?बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटले की, ‘कुछ तो मजबूरी रही होगी, वरना यूं कोई बेवफा नहीं होता’ असे म्हणत त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचे कारण सांगितले. मात्रयाआधी त्यांनी आपली अशी कोणतीच मजबुरी नसल्याचे म्हटले होते.

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बाबाजानी दुराणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार आणि राजू टोपे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटले की, १९८० पासून शरद पवारांच्या नेतृत्वात काम करत आहे. मी साहेबांसोबत चरखा निवडणूक चिन्हापासून घड्याळापर्यंत सोबत काम केले आहे. मराठवाड्यात केवळ तीन नगरपालिका होत्या. आम्ही पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा परिषदेवर १० वर्षापर्यंत राष्ट्रवादीचा झेंडा लावला.

बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटले की, परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. पक्ष फुटला. त्यानंतर काही कारणास्तव, काही लोकांच्या सांगण्यावरून मीही दोन महिन्यानंतर त्यांच्यासोबत गेलो. मात्र मी इतकेच सांगेन की, मी माझ्या आयुष्यात अशी अनेक माणसं बघितली आहेत, जे शरद पवारांना सोडून गेले, ते विधान भवन परिसरात कधी दिसले नाहीत. सर्व शून्य झाले. मला शून्य व्हायचं नाही.

त्यांनी म्हटले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशाचे चित्र स्पष्ट झाले. भाजपसोबत गेलेल्या कोणत्याही प्रादेशिक पक्षाला जनतेने नाकारले आहे. हीच लोकांची मानसिकता आहे.

कोण आहेतबाबाजानी दुर्राणी?

एनसीपीमध्ये फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी अजित पवार यांच्यासोबत गेले होते. विधान परिषद आमदारकीचा त्यांचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. मात्र त्यांना पुन्हा तिकीट देण्यास अजित पवारांनी नकार दिला होता. त्यामुळे ते शरद पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. दुर्राणी २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले होते. त्यानंतर २०१२ आणि २०१८ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य बनले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या