मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar: "अरं बाबा थांब ना.. आम्ही इथं गोट्या खेळायला आलोय का?"; अजित पवार सत्ताधाऱ्यांवर संतापले

Ajit Pawar: "अरं बाबा थांब ना.. आम्ही इथं गोट्या खेळायला आलोय का?"; अजित पवार सत्ताधाऱ्यांवर संतापले

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 22, 2022 08:55 PM IST

Assembly Monsoon Session : निधी वाटपाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाउद्देशून बोलताना भाजप व शिंदे गटातील आमदारांनी गोंधळ घालायला सुरूवात केल्यानंतर अजितपवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले.

अजित पवार सत्ताधाऱ्यांवर संतापले
अजित पवार सत्ताधाऱ्यांवर संतापले

Maharashtra Assembly Monsoon Session : महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन  सुरू आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच वाक् युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार निधी वाटपावरील चर्चेदरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. निधी वाटपाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून बोलताना भाजप व शिंदे गटातील आमदारांनी गोंधळ घालायला सुरूवात केल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले. यावेळी सभागृहात त्यांनी म्हटले की, “अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतंय का? आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?”, असा सवाल केला.

सत्ताधारी आमदारांना बोलताना अजित पवार म्हणाले की, मगाशीच मी तुम्हाला म्हटलंय की, ज्यांना बोलायचं त्यांनी उठून बोलावं. थांब बाबा, तुलाच फार कळतंय का, आम्ही इथं गोट्या खेळायला आलोय का? असा संताप त्यांनी सत्ताधारी आमदारांवर व्यक्त केला. 

अजित पवार म्हणाले की, मी अर्थमंत्री असताना गेल्यावर्षी आमदार निधी ४ कोटी केला. त्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात ५ कोटी आमदार निधी केला. अर्थमंत्री असताना हा शिवसेनेचा, हा भाजपाचा, हा अपक्ष, हा बच्चू कडूंच्या प्रहारचा असा कुठलाही भेदभाव मी केला नाही. सर्वांना समान निधी वाटप करण्याचा प्रयत्न केला. 

अजित पवार  देवेंद्र फडणवीसांना म्हणाले की, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा. २५-१५ चा निधी देण्याची कल्पना या नेत्यांच्या सुपिक डोक्यातून आली होती. २५-१५ आणि ठोक तरतूद असे निर्णय घेण्यात आले. त्याचा वापर मीदेखील मोठ्या प्रमाणात करून घेतला. त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. २५-१५ चा निधी देताना आम्ही महाविकासआघाडीमधील लोकांना पाच कोटीचा निधी दिला हे मी मान्य करतो. परंतु त्याचवेळी आम्ही तुमच्याकडून याद्या घेऊन तुमच्याही आमदारांना दोन दोन कोटी रुपये दिले.” अजित पवारांच्या या विधानावरून सभागृहात गोंधळ झाला. तेव्हा अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं. 

IPL_Entry_Point