अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या

Oct 05, 2024 09:50 AM IST

NCP sachin kurmi murder : मुंबईत भायखळा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या करण्यात आली.

अजित पवार गटाचे पक्षाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या
अजित पवार गटाचे पक्षाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या

NCP sachin kurmi murder : मुंबईत भायखळा येथे शूरकवरी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या भायखळा तालुकाध्यक्षाची हत्या करण्यात आली आहे. काही जणांनी त्यांच्यावर हल्ला करून धार धार शस्त्राने वार करून हत्या केली. तालुकाध्यक्षांना दवाखान्यात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे भायखळा परिसरात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या भायखळा येथील तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या करण्यात आली. ही घटना भायखळा येथील म्हाडा कॉलनीच्या मागे शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास घडली. या हल्ल्यात सचिन कुर्मी हे गंभीर जखमी झाले होते.

काय आहे घटना ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १२ वाजता सचिन कुर्मी हे भायखळा येथील म्हाडा कॉलनी येथे गेले होते. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी सचिन कुर्मी यांच्यावर धार धार शस्त्राने हल्ला केला. यात कुर्मी हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले तेव्हा कुर्मी ही रक्ताच्या थारोळ्यात पडले हतोए. त्यांना पोलिसांनी तातडीने त्यांच्या गाडीतून जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच कुर्मी यांचा मृत्यू झाला होता.

हत्येचे कारण अस्पष्ट

सचिन कुर्मी हे भायखळा तालुकाध्यक्ष होते. त्यांची हत्या का करण्यात आली याचे कारण समजू शकले नाही. मात्र, आर्थिक वादातून ही हत्या झाली असावी असा संशय आले. कुर्मी यांच्या हत्येमुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता पर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाही.

सचिन कुर्मी समीर भुजबळ यांचे जवळचे कार्यकर्ते

समीर कुर्मी ही समीर भुजबळ यांचे जवळचे कार्यकर्ते होते. त्यांच्या हत्येमुळे भुजबळ कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, समीर भुजबळ हे आज कुर्मी कुंटूबांची भेट घेणार आहेत.हत्येची माहिती मिळताच भुजबळ हे मुंबईला रवाना झाले आहेत.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर