NCP Crisis : शरद पवार गटाविरोधात अजित पवार गटाची नवी चाल, आमदार अपात्रता प्रकरणात हायकोर्टात धाव
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NCP Crisis : शरद पवार गटाविरोधात अजित पवार गटाची नवी चाल, आमदार अपात्रता प्रकरणात हायकोर्टात धाव

NCP Crisis : शरद पवार गटाविरोधात अजित पवार गटाची नवी चाल, आमदार अपात्रता प्रकरणात हायकोर्टात धाव

Published Feb 20, 2024 11:30 PM IST

Ncp Ajit Pawar Vs Sharad Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

NCP Crisis
NCP Crisis

Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाच याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' हे नाव कायम राहील, असे स्पष्ट करत निवडणूक आयोगाने एका आठवड्याच्या आत चिन्ह बहाल करण्याचे आदेश दिले. 

सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असतानाच आता पुन्हा शरद पवार गटाचे टेन्शन वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

१५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले होते. यावेळी शरद पवार गटाच्या आमदारांना पात्र करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात अजित पवार गटाने न्यायालयात धाव घेतली आहे.

अजित पवार गटाला खरा राष्ट्रवादी पक्षाचा दर्जा देऊनही शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याच्या निर्णयास अजित पवार गटाच उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद पक्षातील फूट नाही. त्यामुळे दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले होते. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर