आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आज (शुक्रवार) मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या लाडक्या बहीण आहेत. मात्र लाडक्या भावांनी रंग बदलला असून आता ते पिंक झाले आहेत. पण रंग तर सरडा बदलतो. अजित पवारांचा सरडा असा उल्लेख केल्यानंतरअजित पवार गट संतप्त झाला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी संजय राऊतांना दुतोंडी सापाची उपमा दिली आहे.
राऊतांच्या टिकेवर आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, ज्या व्यक्तीचा नरडाच सकाळपासून दुसऱ्यावर तोंडसुख घ्यायला वळवळत असेल तर त्याच्या नरड्यातून सरडा शब्द आला असेल तर त्यात गैर वाटण्याचं कारण नाही. अजित पवारांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केले असेल तर त्यांचा बंदोबस्त राष्ट्रवादीला करता येतो. दुतोंडी सापाने दुसऱ्याकडे तोंड दाखवण्यापेक्षा स्वत:च्या तोंडाकडे पाहावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मिटकरी म्हणाले की, ज्यांनी ठाकरे कुटुंब फोडले. पवार कुटुंब फोडले त्यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या भावा बहिणीच्या नात्यावरबोलू नये. राऊतांसारखा घरभेदी एकदिवस उद्धव ठाकरेंची शिवसेना नक्की संपवणार. गुलाबी रंगाबाबत बोलायचे तर अनेक जोतिबावर गुलालाची उधळण होते. संजय राऊत निवडून आले तेव्हाही गुलालच उधळला असेल. हिंदू धर्मात गुलाब, गुलाल आणि गुलाबी रंग फार पवित्र मानले जातात. त्यामुळे हिंदू म्हणून ऊर बडवायचा आणि दुसरीकडे हिंदू देवीदेवतांची टिंगळ करायची हे योग्य नाही. मात्र जर आम्ही बोलायला लागू तेव्हा गुलाबी रंग आणि लाल रंग कसा असतो हे दाखवून देऊ, असा इशाराही मिटकरींनी दिला.
महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना संजय राऊत म्हणाले की, सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. पण त्यांच्या लाडक्या भावांनी रंग बदलला असून आता ते पिंक झाले आहेत. पण रंग तरसरडा बदलतो. अचानक ते गुलाबी झाले आहेत. आता हा पिंक सरडा बारामती सोडणार आहे म्हणे. पण,तिथून कुठे जाणार हे नक्की माहिती नाही. पण गुलाबी रंग हा महाराष्ट्रासाठी नाही. आपला रंग भगवाच आहे. तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्रीकेसीआर यांचा रंगही पिंक होता त्यांना सुद्धा आम्ही बोललो पिंक नही चलेंगा... एक तर भगवा चालेल नाहीतर तिरंगा चालेल. बाळासाहेब नेहमीच म्हणायचे भगवाचं तिरंग्याला वाचवेल.