अजित पवारांचे शिलेदार बाबुराव चांदेरे यांची मुजोरी सुरूच! वृद्धाला मारहाणीनंतर आता दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजित पवारांचे शिलेदार बाबुराव चांदेरे यांची मुजोरी सुरूच! वृद्धाला मारहाणीनंतर आता दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल

अजित पवारांचे शिलेदार बाबुराव चांदेरे यांची मुजोरी सुरूच! वृद्धाला मारहाणीनंतर आता दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल

Jan 27, 2025 08:53 AM IST

Pune Baburao Chandere Viral Video : पुणे महानगर पालिकेचे माजी नगरसेवक व स्थायी समितीची अध्यक्ष यांची सामान्य नागरिकांना मारहाण व दमदाटीचे प्रकार सुरूच आहे. त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पुण्यात अजित पवारांचे शिलेदार बाबुराव चांदेरेंची मुजोरी सुरूच! एकाला मारहाण केल्यानंतर दमदाटीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
पुण्यात अजित पवारांचे शिलेदार बाबुराव चांदेरेंची मुजोरी सुरूच! एकाला मारहाण केल्यानंतर दमदाटीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

Pune Baburao Chandere Viral Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे असणारे पुणे महानगर पालिकेचे माजी नगर सेवक व स्थायी समितिचे सदस्य बाबुराव चांदेरे यांची सामान्य नागरिकांना दमदाटी करण्याचे प्रकार वाढले आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला कुस्तीत धोबी पंचाद देतात तसे उचलून जमिनीवर आपटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकारणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असतांना त्यांचा आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ते मजुरांना दमदाटी करतांना दिसत आहे.

बाबुराव चांदेरे हे त्यांच्या वादग्रस्त कृतीने नेहमी चर्चेत असतात. चांदेरे यांनी जमिनीच्या वादातून पुण्यात एका नागरिकांना नागरिकाला मारहाण केल्याचा संताप जनक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मारहाण झालेल्या व्यक्तीला डोक्यावर व गुडघ्याला मार लागला होता. या प्रकरणी बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ताजी असतांना त्यांचा सर्व सामान्य नागरिकांना दमदाटी करण्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बाबुराव चांदेरेंनी जागेच्या वादातून विजय रौंदळ व प्रशांत जाधव या दोघांना मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी काही कामगारांना दमदाटी करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर पावसाळ्यात देखील वाहतूक कोंडीत एका रिक्षा चालकाला त्यांनी मारहाण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

चांदेरे यांच्या या व्हायरल व्हिडिओमुळे विरोधकांनी अजित पवार यांना लक्ष केलं आहे. या बाबत अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली असून पक्षात या प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. कुणी तक्रार दिली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिले. सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोप होऊनही त्यांची पाठराखण केल्याची टीका अजित पवारांवर होत आहे. त्यात पुण्याचे पालकमंत्री असतांना माजी नगर सेवक असलेल्या बाबुराव चांदेरे यांच्यामुळे अजित पवार यांच्यावर आता पुन्हा टीका होऊ लागली आहे.

कोण आहेत बाबुराव चांदेरे?

बाबुराव चांदेरे हे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ते पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष देखील राहिले आहेत. पुण्यातल्या बावधन, पाषाण भागात ते राष्ट्रवादी काँग्रेसचं काम सांभाळतात. सध्या ते राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाहक असून त्यांनी बारामतीत भरवलेल्या कबड्डी स्पर्धेच्या आयोजनात मोठा सहभाग घेतला होता. बाबुराव चांदेरे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन वेळा नगरसेवक राहिले आहेत. १९८६ मध्ये त्यांच्या लग्नानंतर त्यांनी त्यांचे सासरे मारुतराव धनकुडे यांच्यासोबत राजकारणात प्रवेश केला. त्यांचे सासरे शरद पवार यांच्या जवळचे होते. राजकारण करत असतांना, चांदेरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आले. कब्बडी प्रेमी असल्याने त्याने खेळातही मोठे योगदान दिले आहे. त्यांनी सतेज कबड्डी संघाची स्थापना त्यांनी केली आहे. त्यांचा मुलगा समीर चांदेरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा पुणे शहराचा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर