मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : सिंचन घोटाळ्यात अजित पवारांवर कारवाईची टांगती तलवार? मोठी माहिती आली समोर

Ajit Pawar : सिंचन घोटाळ्यात अजित पवारांवर कारवाईची टांगती तलवार? मोठी माहिती आली समोर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 17, 2022 08:06 PM IST

सिंचन घोटाळ्यात (Irrigation Scam) अजित पवारांना (Ajit Pawar) अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अजित पवार
अजित पवार

Maharashtra Irrigation Scam: सिंचन घोटाळ्यात (Irrigation Scam) अजित पवारांना (Ajit Pawar)  अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे. २०१९ मध्ये एसीबीने दिलेल्या क्लीन चिटबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) अद्याप स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे. यामुळे महाराष्ट्राचे राजकरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. 

भाजपचे नेते मोहित भारतीय (कंभोज) यांनी मंगळवारी रात्री काही ट्वीट्स करून राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे म्हणत सिंचन घोटाळ्याची (Irrigation Scam) पुन्हा चौकशीची मागणी केली  आहे. यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यातच अजित पवार (Ajit Pawar) यांना सिंचन घोटाळ्यात अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये एसीबीने दिलेल्या क्लीन चिटबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) अद्याप स्वीकारला नसल्याची बाब समोर आली आहे.

अजित पवारांच्या क्लिन चीटबाबतचा अहवाल मागील दोन वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court)  तसाच पडून असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या अडचणी वाढू शकतात. २०१९ मध्ये अजित पवार (Ajit Pawar)  यांना सिंचन घोटाळ्यात एसीबीने क्लीन चिट दिली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ही क्लीन चिट दिली होती. याबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता. मात्र मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रात कोरोना संक्रमनामुळे न्यायालयाने हा अहवाल अद्याप स्वीकारला नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. 

IPL_Entry_Point