मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal News : '५० लाख द्या अन्यथा शिरच्छेद करू', लाल सलाम म्हणत नक्षलवाद्याची व्यापाऱ्याला धमकी

Yavatmal News : '५० लाख द्या अन्यथा शिरच्छेद करू', लाल सलाम म्हणत नक्षलवाद्याची व्यापाऱ्याला धमकी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 09, 2022 04:34 PM IST

Yavatmal News Update : विदर्भातील यवतमाळमध्ये एका नक्षलवाद्यानं व्यापाऱ्याला ५० लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Yavatmal News Update
Yavatmal News Update (HT)

Yavatmal News : गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत नक्षलवाद्यांची दहशत आहे. अनेकदा केंद्र व राज्य सरकारस्तरावर नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली जाते. परंतु आता यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहरातल्या एका व्यापाऱ्याला ५० लाखांच्या खंडणीसाठी नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. रक्कम न दिल्यास व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी लाल लिफाफ्यात व्यापाऱ्याला लिहिलेल्या धमकीपत्रात दिली आहे. या प्रकरणामुळं यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता घाटंजी पोलिसांनी या केसमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीतील कुख्यात नक्षल दलमच्या कमांडरने हे कृत्य केल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळमधील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याला लाल रंगाच्या लिफाफ्यातून एक पत्र मिळालं, ते वाचून त्यांना धक्काच बसला. कारण त्यात मी गडचिरोली नक्षल दलम कमांडर क्रमांक ३८ असून मला तातडीनं ५० लाख रुपये द्या, अन्यथा तुमचा आणि तुमच्या कुटुबियांचा शिरच्छेद करून त्यांना ठार मारू', अशी धमकी देण्यात आली होती. हिंदी भाषेत हे पत्र लिहिण्यात आलं असून या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय लिहिलंय पत्रात?

लाल, सलाम. मला तुम्ही ५० लाख रुपये १२ ऑगस्टपर्यंत उमरी ते करंजी मार्गावर असलेल्या हनुमान मंदिराजवळ आणून द्या, नाही तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना जीवे मारू, अशी धमकी त्यात देण्यात आली आहे. त्यामुळं यवतमाळमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान आता हे धमकीचं पत्र नेमकं कुणी, आणि का, लिहिलंय हे अजून स्पष्ट झालेलं नाही. यवतमाळ जिल्ह्यातील काही तालुक्यांचाही समावेश नक्षलग्रस्त भागांमध्ये करण्यात आला होता. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तिथं कोणत्याही कारवाया न झाल्यानं जिल्ह्यातील नक्षलवादग्रस्त तालुके रद्द करण्यात आले होते, त्यानंतर आता ही घटना घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग