Nawab Malik son in law Sameer Khan : मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक यांचे जावई यांच्या थार कारला एसयूव्हीने मागून धडक दिली. या अपघातात जावई समीर खान गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती खुद्द नवाब मलिक यांनी दिली आहे.
१७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात झाला होता. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर व त्यांचे पती समीर खान क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये नियमित आरोग्य तपासणीसाठी गेले असतांना तपासणी झाल्यानंतर घरी येण्यासाठी ते कारची वाट बघत उभे होते. त्यावेळी त्यांच्याच ड्रायव्हरने त्यांच्यावर गाडी घातली होती.
दरम्यान, त्यांचे कार चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी हे गाडी घेऊन आले असता त्यांचा पाय अचानक कारच्या एक्सलेटरवर पाय ठेवला गेल्याने थार कार थेट समीर खान यांच्या अंगावर गेली. यात ते गंभीर जखही झाले. त्यांना लगेच क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूला मार लागला आहे. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
समीर खान यांच्याबद्दल काही उलटसुलट माहिती माध्यमांमध्ये आली होती. त्यावर नवाब मलिक यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे. 'माझ्या जावयाच्या प्रकृतीविषयी समाजमाध्यमांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात आहे. काल त्यांची प्रकृती गंभीर होती, मात्र आता त्यात सुधारणा होत आहे. त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये, असं आवाहन नवाब मलिक यांनी केलं आहे.
संबंधित बातम्या