नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; अपघातानंतर ६ आठवड्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; अपघातानंतर ६ आठवड्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; अपघातानंतर ६ आठवड्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

Nov 03, 2024 07:27 PM IST

Sameer Khan Death : नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झालं आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. काहीआठवड्यापूर्वी समीर खान यांचा अपघात झाला होता.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान
नवाब मलिक यांचे जावई समीर खान

Sameer Shaikh Death : राष्ट्रवादीचे मंत्री व माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झालं आहे. मागील ६ आठवड्यांहून जास्त काळ समीर खान यांची मृत्यूची झुंज आज अपयशी ठरली. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. समीर खान हे नवाब मलिक यांची मोठी मुलगी निलोफर मलिक हिचे पती होते. चार आठवड्याआधी त्यांचा अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झालं आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. काही आठवड्यापूर्वी समीर खान यांचा अपघात झाला होता. समीर खान यांच्या निधनाने खान आणि मलिक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नवाब मलिक यांनी ट्वीटरवरुन दिली माहिती -

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व मानखुर्द विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नवाब मलिक यांनी ट्विट करत आपल्या जावयाच्या मृत्यूची माहिती दिली आहे. नवाब मलिक म्हणाले की, माझे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. अल्लाह त्यांना स्वर्गात सर्वोच्च स्थान देवो. समीर यांच्या जाण्याने आमच्या परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवसांचे माझे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत.

समीर खान यांचा १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११  वाजण्याच्या सुमारास अपघात झाला होता. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर व त्यांचे पती समीर खान कुर्ला पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री रोडवरील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये नियमित आरोग्य तपासणीसाठी गेले होते. तपासणी झाल्यानंतर हॉस्पिटलबाहेर घरी येण्यासाठी ते कारची वाट बघत उभे होते. त्यावेळी त्यांच्याच कार चालकाने त्यांच्यावर गाडी घातली होती. 

कारचालक अबुल मोहम्मद सौंफ अन्सारी (वय ३८) हे गाडी घेऊन आले. समीर व निलोफर गाडीत चढत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याच्याकडून नकळत अॅक्सिलेटर दाबले गेले. महिंद्रा थार गाडी थेट समीर खान यांच्या अंगावर गेली. कार व भिंतीमध्ये अडकून समीर खान गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूला मार लागला होता. जवळपास ६ आठवड्यानंतर खान यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर