Nawab Malik : दीड वर्षानंतर अटी- शर्थींसह नवाब मलिक जेलबाहेर, रुग्णालयाबाहेर समर्थकांचा जल्लोष
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nawab Malik : दीड वर्षानंतर अटी- शर्थींसह नवाब मलिक जेलबाहेर, रुग्णालयाबाहेर समर्थकांचा जल्लोष

Nawab Malik : दीड वर्षानंतर अटी- शर्थींसह नवाब मलिक जेलबाहेर, रुग्णालयाबाहेर समर्थकांचा जल्लोष

Aug 14, 2023 08:49 PM IST

Nawabmalik : जामीन मंजूर झाल्यानंतरराष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेव माजी मंत्रीनवाब मलिक यांची दीड वर्षानंतर तुरुंगातून मुक्तता झाली आहे. रुग्णालयाबाहेर सर्मथकांची गर्दी झाली असून मलिकांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.

Nawab malik
Nawab malik

मुंबई – जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांची दीड वर्षानंतर तुरुंगातून मुक्तता झाली आहे. जामीनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्रिटी केअर रुग्णालयाबाहेर नवाब मलिकांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. रुग्णालयामध्ये नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.

प्रकृतीच्या कारणास्तव वैद्यकीय जामीन मिळावा, अशी याचिका नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात मंजूर केल्यानंतर आज त्यांची सुटका करण्यात आली. गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. तेव्हापासून त्यांचा अनेक वेळा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

आज सायंकाळच्या सुमारास जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मलिक यांना जेलमधून बाहेर आणण्यात आलं. वैद्यकीय उपचारासाठी न्यायालयाकडून दोन महिन्यांसाठी मलिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. जेलमधून बाहेर येताच नवाब मलिक यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं. जेलमधून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक घरी निघाले. नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला असला तरी न्यायालयाने त्यांच्यासमोर काही अटी ठेवल्या आहेत. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मलिक यांना जामीन देण्यात आला.
नवाब मलिकांना न्यायालयाने ठेवलेल्या अटी -
 

  • मलिक यांनी प्रकरणातील साक्षीदार आणि अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवायचा नाही.
  • मलिक यांच्याशी संपर्क होईल तो फोन नंबर आणि पत्ता ईडीच्या अधिकाऱ्यांना द्यावा.
  • ओरिजीनल डॉक्युमेंट आणि पासपोर्ट ईडीकडे जमा करावा. 
  • माध्यमाशी संवाद साधायचा नाही, फक्त हीच केस नाही तर कोणत्याही प्रकरणाशी संबंधित माध्यमांना प्रतिक्रिया द्यायची नाही
  • वैद्यकीय चाचणीत रुग्णालयातून जी माहिती मिळेल ती पूर्ण ईडीच्या मुंबईतील अधिकाऱ्यांना वेळोवेळी द्यावी.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर