Nawab Malik Latest News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. मलिक यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना कुर्ला येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.
नवाब मलिक हे वैद्यकीय कारणामुळे जामिनावर आहेत. मात्र, शनिवारी दुपारी अचानक त्यांना श्वासनाचा त्रास होऊ लागला. सध्या नवाब मलिक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांची एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे, अशी माहिती त्यांनी मुलगी सना मलिक यांनी दिली.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित प्रकरणात नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. पंरतु, नवाब मलिक यांना मूत्रपींड आणि इतरही शारीरिक त्रास असून त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचे त्यांच्या वकीलाने न्यायालयात सांगितले. त्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला.