मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vegetable Price news : टोमॅटो, हिरवा वाटाणा २०० रुपये किलो; एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्यांचे भाव वाढले!

Vegetable Price news : टोमॅटो, हिरवा वाटाणा २०० रुपये किलो; एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्यांचे भाव वाढले!

Jun 25, 2024 12:23 PM IST

Vegetable Prices Surge In APMC Market: नवी मुबंईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

महागाईचा सामना करत असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
महागाईचा सामना करत असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री (Unsplash)

APMC Market Vegetable Prices: बदलत्या हवामानामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली. उन्हाचा तडाखा अन् अवकाळीमुळे पीक उत्पादनावर गंभीर परिणाम झाला, ज्यामुळे ताज्या उत्पादनांची टंचाई निर्माण झाली आणि बाजारभावात वाढ झाली. आठवडाभरापूर्वी १०० रुपयांनी विकत घेतलेल्या भाज्या आता २०० रुपयांनी खरेदी करावे लागत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. तर, कोकण प्रदेशासह महाराष्ट्राच्या किनारपट्टी आणि पश्चिम भागात अवकाळी पाऊस पडला आहे, ज्यामुळे पीक आणि कापणी प्रक्रियेत व्यत्यय आला आहे.

राज्यात बदलत्या हवामानाचा पीकांवर नकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळते. कडक उन्हामुळे भाजीपाल्याची नासाडीही झाली. टोमॅटो, हिरवी मिरची आणि पालेभाज्या यांसारख्या भाज्या कापणीपूर्वीच कोमेजत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे भाजीपाल्यांचा पुरवठा कमी झाला असून किंमती वाढल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

टोमॅटो आणि हिरव्या वाटाण्याचे भाव गगनाला

कडक उन्हाचा तसेच अवकाळी पावसाचा परिणाम भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वाहनांवर झाला. एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांमध्ये ५० टक्के घट झाली आहे. मुंबईच्या बाजारपेठेत दररोज ५० हजार टन भाजीपाल्याची आवश्यकता असते. उत्पादकता कमी झाल्यामुळे पुरवठा निम्म्यावर आला, ज्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या किंमतीवर झाला आहे. बाजारात २० रुपये प्रति २५० ग्रॅमच्या खाली कोणतीही भाजी उपलब्ध नाही. किरकोळ बाजारात हिरवे वाटाणे आणि टोमॅटो ५० रुपये प्रति २५० ग्रॅम दराने विकले जात आहेत. घाऊक बाजारात भेंडी ६ हजार ८०० रुपये प्रति टन विकली जात आहे. त्याचप्रमाणे फुलकोबी ३ हजार ३०० रुपये प्रति टन, गाजर २ हजार ४०० रुपये प्रति टन, काकडी २ हजार ९०० रुपये प्रति टन, टोमॅटो ३ हजार ८०० रुपये प्रति टन दराने विकले जात आहे.

तज्ज्ञांनी दिला असा इशारा

आधीच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईचा सामना करत असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. हवामानात बदल न झाल्यास आणि उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्यास राज्याला भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींचा दीर्घकाळ सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर