Navi Mumbai Water News: नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. नवी मुंबईकरांना उद्या पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने बेलपाडा मेट्रो स्टेशनजवळील मोरबे मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. नवी मुंबईत उद्या (०४ फेब्रुवारी २०२५) १० तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, बेलपाडा मेट्रो स्टेशनजवळील मोरबे मुख्य जलवाहिनीची तातडीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी रहिवाशांना १० तास पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. मंगळवारी सकाळी १०.०० ते ००.०८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या कालावधीत बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपर खैरणे, घणसोली आणि ऐरोलीसह अनेक भागात पाणीपुरवठा खंडीत केला जाईल. या भागांव्यतिरिक्त मुख्य जलवाहिनीतून थेट पाणी जोडणी आणि कामोठे नोड (सिडको क्षेत्र) येथील पाणीपुरवठा देखील बंद राहील. दरम्यान, जलवाहिनीच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांना कमी दाब किंवा अपुरा पाणीपुरवठा होऊ शकतो.
जानेवारी महिन्यापासून दुसऱ्यांदा नवी मुंबईतील येथील पाणीपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. याआधी नवी मुंबई महानगरपालिकेने मुख्य जलवाहिनीची दुरूस्ती केली होती. वारंवार पाणीपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेषत: कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरबाहेर पडणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक लोकांना सकाळी कामाला जाण्याआधी पाण्याची व्यवस्था करावी लागते, अशी खंत नेरुळ येथील रहिवाशांनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या