मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai News : नवी मुंबईत भटक्या कुत्र्यांची दहशत; वर्षभरात १६ हजार श्वानदंशाची नोंद

Navi Mumbai News : नवी मुंबईत भटक्या कुत्र्यांची दहशत; वर्षभरात १६ हजार श्वानदंशाची नोंद

May 23, 2024 09:37 PM IST

Stray Dogs in Navi Mumbai : श्वान दंशाच्या घटना वाढल्या असताना दुसरीकडे प्राणी हक्क कार्यकर्ते नागरिकांना दोष देतात. श्वानप्रेमी सॅम्युअल दास यांनी सांगितले की, कोणताही कुत्रा चिथावणी दिल्याशिवाय हल्ला करत नाही. तसेच भीतीपोटीही त्यांच्याकडून हल्ला होतो.

नवी मुंबईत वर्षभरात १६ हजार श्वानदंशाची नोंद. (Photo by Bachchan Kumar/ HT PHOTO) (HT PHOTO)
नवी मुंबईत वर्षभरात १६ हजार श्वानदंशाची नोंद. (Photo by Bachchan Kumar/ HT PHOTO) (HT PHOTO)

नवी मुंबई शहरात गेल्या वर्षभरात श्वानदंशाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.  रात्रीच्या वेळी अनेक बाय रोडवर कुत्र्यांची झुंड आक्रमकपणे फिरत असते.  अनेक भागात दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. तसेच परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिसत आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात २०२३-२०२४ मध्ये श्वानदंशाच्या १६ हजार घटना घडल्या आहे. तर २०२२-२०२३ मध्ये १२ हजार ६५६ घटना घडल्या. शहरात दररोज सरासरी ४४ रहिवाशांना दंश केला जातो.

प्राणी जन्म नियंत्रण (कुत्रे) नियम, २००१ अंतर्गत एनएमएमसीचा श्वान नियंत्रण कार्यक्रम चालविला जातो. मोकाट कुत्र्यांना पकडणे, त्यांचे निर्जंतुकीकरण करणे, त्यांचे कान चिन्हांकित करणे, रेबीज प्रतिबंधक लस देणे आणि नंतर त्यांना त्यांच्या भागात सोडणे या कार्यक्रमाचा समावेश आहे. 'इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स' तर्फे २००६ पासून श्वान नियंत्रण केंद्र चालविले जात आहे.

२०१२ मध्ये झालेल्या श्वानगणनेत शहरात २९ हजार ८६४ भटकी कुत्री आणि ३११० पाळीव कुत्रे आढळून आले होते. एनएमएमसीचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवाडे म्हणाले, 'आमच्याकडे श्वान नियंत्रण कार्यक्रम अतिशय कार्यक्षम आहे. सुमारे ८० टक्के कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. पकडलेल्या सर्व कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते आणि त्यांना नेहमीच रेबीजप्रतिबंधक लस दिली जाते.

गेल्या वर्षी १३४५ कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असून ७ हजार १५६ कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या आठ वर्षांत १८ हजार ७६५ कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले, तर ५८ हजार २५८ कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले.

प्रत्येकजण समाधानी नसतो. कोपर खैरणे सेक्टर ११ मध्ये राहणारे राहुल कदम म्हणाले, कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण केल्याने श्वान दंशाच्या घटना रोखता येणार नाहीत. त्यासाठी भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्याची गरज आहे. रात्री आमच्या  घराच्या परिसरात फेरफटका मारणं,  हे एक दु:स्वप्न झालं आहे.  अनेक भटकी कुत्री रात्र असो की दिसस दुचाकीस्वारांचा पाठलाग करतात आणि रात्री उशिरा दुचाकीवरून घरी जाणे तर खुपच धोक्याचे असते.

एनआरआय कॉलनी नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक सुधा सकपाळ यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भटक्या कुत्र्यांना चारा देण्यास विरोध करताना सांगितले होते की, अशाच एका वॉकदरम्यान मला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. हा आघात अजूनही कायम आहे.

दुसरीकडे प्राणी हक्क कार्यकर्ते रहिवाशांना दोष देतात. वाशीतील सेक्टर १० मधील डॉग फीडर सॅम्युअल दास म्हणाले, 'कोणताही कुत्रा चिथावणी दिल्याशिवायहल्ला करत नाही. कुत्रा भीतीपोटी हल्ला करत असतो. तसेच आपल्या बाळांच्या रक्षणासाठी असे करतात. भटक्या कुत्र्यांवर रहिवाशांनी कशा प्रकारे हल्ला करून त्यांच्यावर विषप्रयोग केल्याची  आकडेवारी आमच्याकडे आहे. माझ्या परिसरात चार कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांना ते ज्या भागात आहेत त्या भागातून हलवता येणार नाही, असेही दास म्हणाले. त्यांनाही त्यांचे अधिकार आहेत. आपण त्यांच्यासोबत शांततेने राहण्याची गरज आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग