नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! आज पाणीपुरवठा बंद, तर उद्या कमी दाबाने होणार पुरवठा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! आज पाणीपुरवठा बंद, तर उद्या कमी दाबाने होणार पुरवठा

नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! आज पाणीपुरवठा बंद, तर उद्या कमी दाबाने होणार पुरवठा

Jan 08, 2025 10:39 AM IST

Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईत आज पुरवठा बंद राहणार आहे. तर उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! आज पाणीपुरवठा बंद तर उद्या गुरुवारी कमी दाबाने होणार पाणी पुरवठा
नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! आज पाणीपुरवठा बंद तर उद्या गुरुवारी कमी दाबाने होणार पाणी पुरवठा

Navi Mumbai Water Supply Update: नवी मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. शहरात आज पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. तर उद्या गुरुवारी पाणी कमी दाबाने येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

पाणी पुरवठा बंद असण्याचे काय आहे आहे कारण ?

नवी मुंबईत उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जाते. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमध्ये पाणी कमी झाल्याने दरवर्षी हा निर्णय घेतला जातो. मात्र, आता पाणी पुरवठा योग्य असतांना शहराचा पाणी पुरवठा हा बंद करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम पालिकेने हाती घेतले आहे. या कामासाठी शहराला होणारा पाणी पुरवठा हा बंद करावा लागणार आहे.

त्यामुळे आज नवी मुंबई मधील सर्व प्रभागात सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तर उद्या गुरुवारी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेने केलं आहे. शुक्रवारी सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारी मोरबे धरणाची पाईपलाइनमध्ये अचानक बिघाड आला आहे. हा बिघाड व देखभाल दुरुस्तीसाठी ही दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. दुरुस्तीसाठी पाणी बंद करावे लागते. यामुळे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असतो. या पूर्वी देखील अनेकदा दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा हा बंद करण्यात आला आहे. दरम्यान, पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल पालिकेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर