मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत आठवड्यातून २ दिवस पाणीकपात; मोरबे धरणात २९ टक्के पाणीसाठा शिल्लक!

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत आठवड्यातून २ दिवस पाणीकपात; मोरबे धरणात २९ टक्के पाणीसाठा शिल्लक!

Jun 04, 2024 09:40 PM IST

Morbe Dam Water Storage: मोरबे धरणात २९ टक्के पाणीसाठा शिल्लक नवी मुंबईतील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

नवी मुंबईत आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात जाहीर करण्यात आली.
नवी मुंबईत आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात जाहीर करण्यात आली.

Navi Mumbai Water Supply: मोरबे धरणातील घटत्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळा सुरू होईपर्यंत नवी मुंबईत दर आठवड्याला दोन दिवस पाणीकपात जाहीर केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मोरबे धरणात फक्त २९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नवी मुंबईतील नागरिकांना पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शहरात सर्व ठिकाणी पाणीकपात होणार आहे, असे नवी मुंबईच्या अधिकाऱ्याने सांगितले. नागरी प्रशासनाच्या अंदाजानुसार, मोरबे धरणातून पुढील ५२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. “गेल्या वर्षीच्या आकडेवारीचा विचार करता मोरबे धरणातील पाणीपातळी अजूनही पुरेशी आहे. मात्र पाऊस लांबल्यास किंवा धरण भरण्यास विलंब झाल्यास प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. सध्या धरणात २९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे", असे जल विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

नवी मुंबईत आजपासून पाणीकपात लागू

मोरबे धरणाची पाणीपातळी ७०.४६ मीटर आहे. धरण ८८ मीटर भरल्यानंतर ओव्हरफ्लो होते. ४ जूनपासून पाणीकपात लागू करण्यात आली. माजी नगरसेवकांकडून रहिवाशांना पाणी जपून वापरण्याचा इशारा दिला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत सोमवार आणि गुरुवारी पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. तर, इतर दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

कोणत्या भागात कुठल्या दिवशी पाणीकपात?

जलविभागाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार, कोपरखैरणे परिसरात मंगळवार आणि शनिवारी पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. घणसोली बुधवार आणि रविवारी या दोन दिवशी पाणीकपात असेल. वाशीमध्ये गुरुवारी आणि सोमवारी पाणीकपात असेल. तर, नेरुळमध्ये पाणीकपात होणार आहे. मंगळवार आणि शनिवारी प्रभावित आणि तुर्भेमध्ये रविवार आणि बुधवारी पाणीकपात होणार आहे.

जुहू, कोळीवाड्यात पाणीटंचाई, ६ दिवसांपासून नागरिक पाण्याविना

अंधेरी पश्चिमेकडील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेने गेल्या आठवड्यात जुन्या पाण्याचे पाईप बदलले असले तरी जुहू कोळीवाडा, मांगलेवाडी, जुहू तारा, इंद्रनगर परिसरातील १०० हून अधिक घरांतील नळ सहा दिवसांपासून कोरडे पडले आहेत. अनेक कुटुंबांना पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही, तर काही कुटुंबांना १० मिनिटे पाणीपुरवठा झाला. या परिस्थितीमुळे रहिवाशांची तारांबळ उडाली आहे. काहींनी बाटलीबंद पाणी, टँकरचे पाणी विकत घेतले आहे, तर काहींनी बोअरवेलचे पाणी विकत घेतले आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग