मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai Murder: इतर पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रेयसीची हत्या, प्रियकराला अटक

Navi Mumbai Murder: इतर पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रेयसीची हत्या, प्रियकराला अटक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 09, 2024 05:45 PM IST

Man Kills Girlfriend In Navi Mumbai: इतर पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

Navi Mumbai Crime
Navi Mumbai Crime

Navi Mumbai Saki Naka Murder: एका खासगी बँकेच्या ३५ वर्षीय मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. मृत तरुणीचे इतर पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपीने तिची गळा आवळून हत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी मंगळवारी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शोएब शेख (वय, २४) असे प्रेयसीची हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेश येथील असून सध्या तो मुंबईच्या साकी नाका परिसरात वास्तव्यास होता. आरोपी आणि मृत तरुणी एमी उर्फ अमित रवींद्र कौर (वय, ३५) यांच्यात प्रेमसंबंध होते, अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली. परंतु, तिचे इतर दुसर्‍या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा आरोपीला संशय होता. दरम्यान, दोघेही सोमवारी नवी मुंबई येथील एका हॉटेलमध्ये थांबले. त्यावेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर आरोपीने एमीचा गळा आवळून तिची हत्या केली.

शेखचा काही बेकायदेशीर कामात सहभाग असल्याची पोलिसांना माहिती मिळाली . याप्रकरणी मुंबई पोलीस शेखच्या घरी पोहोचले. त्यावेळी चौकशीदरम्यान शेखने पोलिसांना हत्येची माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. तुर्भे येथील पोलिसांचे एक पथक हॉटेलमध्ये दाखल झाले, जिथे त्यांना एका खोलीत महिलेचा मृतदेह आढळला.

मृत तरुणी आयडीएफसी बँकेच्या नवी मुंबई शाखेत व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. ती मुंबईतील सायन कोळीवाडा भागातील रहिवासी होती. मृतदेह सापडल्यानंतर शेखला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत त्याला अटक करण्यात आली.

WhatsApp channel

विभाग