Minor Girl Rape in Navi Mumbai: महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात असताना नवी मुंबईतील वाशी येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. शेजारच्या १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवाात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वाशी येथील कोपरी गावातील एका इमारतीत वास्तव्यास आहे. आरोपी देखील त्याच इमारतीत राहतो. काही दिवसांपूर्वी पीडिताच्या पोटात दुखू लागल्याने पालकांनी तिला दवाखान्यात नेले. मात्र, वैद्यकीय अहवालात पीडिता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. याप्रकरणी पीडिताच्या पालकांनी तिच्याकडे विचारपूस केले असता तिने संपूर्ण प्रकार सांगितला. आरोपीने २०२० पासून अनेक वेळा पीडितावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडिताच्या पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देताच आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला, असे एपीएमसी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणातील आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी पीडिताचे नातेवाईक करत आहेत.
आजीच्या घरी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका तरुणाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना पंजाबच्या जालंधर बायपास चौकाजवळ घडली. जसपाल सिंग ऊर्फ फौजी असे आरोपीचे नाव असून पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आजीला भेटायला जाते, हे सांगून घराबाहेर पडली. पीडित मुलगी तिच्या आजीच्या घरी पोहोचली की नाही, याची खातरजमा करण्यासाठी पीडिताच्या आईने तिच्या आजीला फोन केला. परंतु, पीडिता तिथे पोहोचली नसल्याचे समजात तिच्या आईने शोधाशोध सुरू केली. त्यावेळी पीडित जालंधर बायपासजवळ रस्त्येच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर रडत असल्याचे तिला दिसली. याबाबत पीडिताच्या आईने तिच्याकडे विचारपूर केली असता तिने सांगितले की, आजीच्या येथे जात असताना एक तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने मला आजीच्या घरी सोडते असे सांगितले. त्यानंतर त्याने तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.याप्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५ (१) (सोळा वर्षांखालील महिलेवर बलात्कार) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.