Navi Mumbai Accident: घणसोली येथे भरधाव पिकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीवरील डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai Accident: घणसोली येथे भरधाव पिकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीवरील डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

Navi Mumbai Accident: घणसोली येथे भरधाव पिकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीवरील डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

Nov 01, 2024 09:02 PM IST

Delivery Boy Dies by Accident In Navi Mumbai: नवी मुंबईतील घणसोली परिसरात पिकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीवरील डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

नवी मुंबई: घणसोलीत भरधा व्हॅनच्या धडकेत दुचाकीवरील डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
नवी मुंबई: घणसोलीत भरधा व्हॅनच्या धडकेत दुचाकीवरील डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

Pickup Van Collision With Two-Wheeler In Mumbai: नवी मुंबईतील घणसोली परिसरात भीषण अपघात घडला. भरधाव पिकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीवरील डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. नोडमधील सेक्टर २ मधील घणसोली दुर्गासमोर ही घटना घडली. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, मोटार वाहन कायदा १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.

फैजान इर्शाद कुरेशी (वय, ३०) असे मृताचे नाव असून ते कोपरखैरणे येथील रहिवाशी आहेत. फैजान हा आपल्या दुचाकीने घणसोली स्थानकाकडे निघाला. परंतु, कोकण फ्युजन हॉटेल येथे आले असता विरुद्ध दिशेकडून भरधाव वेगात आलेल्या पिकअप व्हॅनने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत फैजानला गंभीर दुखापत झाली. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोहम्मद शमीम मोहम्मद इस्ताज अन्सारी (वय, २७) असे पिकअप व्हॅन चालकाचे नाव असून त्याच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, रहिवाशांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुला केलेल्या चुकीच्या पार्किंगवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. ज्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. अनधिकृत पार्किंगमुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचा रहिवाशांनी आरोप केला आहे.

नवले पुलाजवळ अपघातात ट्रकचालक ठार

पुण्यातील कात्रज-देहूरोड बायपासवर उभ्या असलेल्या क्रेनला दिलेल्या धडकेत ट्रकचालकाचा मृत्यू झाला. तर, एक जण जखमी झाला. ट्रक कात्रज चौकातून नवले पुलाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.सलीम मकबूल शेख (वय ५८, रा. उमरगा, जि. धाराशिव) असे मृताचे नाव आहे. समीर मोमीन असे जखमीचे नाव आहे. लातूरहून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक कात्रजहून नवले पुलाच्या दिशेने जात असताना चालकाचे चाकावरील नियंत्रण सुटले. चालकाने सर्व्हिस लेनमध्ये प्रवेश केला आणि क्रेनला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला,' अशी माहिती सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी दिली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेन आणि ट्रकमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. या अपघातामुळे बायपासवरील वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. सर्व्हिस लेनमधून ट्रक आणि क्रेन हटवल्यानंतर वाहतूक पोलिसांनी काही मिनिटांतच वाहतूक सुरळीत झाली', अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी दिली आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर