Navi Mumbai: पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai: पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Navi Mumbai: पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Ashwjeet Jagtap HT Marathi
Published Feb 08, 2025 11:19 AM IST

Podar International School Suicide News: पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Navi Mumbai Suicide News: पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील नववीच्या आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी सकाळी शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. सकाळी असेंब्ली सुरू असताना ही घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनामध्ये खळबळ माजली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील नेरुळच्या सेक्टर ३६ मध्ये असलेल्या शाळेच्या कॅन्टीनमधून मुलाने उडी मारून आत्महत्या केली. स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगा भिंतीवर चढताना आणि नंतर पाचव्या मजल्यावरून उडी मारताना दिसत आहे. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर