Navi mumbai building collapsed : नवी मुंबईत आज पहाटेच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली आहे. बेलापूर येथील शहाबाज गावात तीन मजली इमारत अचानक कोसळली. या इमारतीत तब्बल २६ कुटुंबे राहत होती. ५० नागरिकांना वाचवण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले आहे. तर दोघांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. नागरिक वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी सुदैवाने टळली आहे.
नवी मुंबईतील बेलापुर परिसरातील शहाबाज भागात ही इमारत आहे. ही इमारत ३ मजली आहे. या इमारतीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी इमारतीला हादरे बसले. यावेळी साखर झोपेत असलेल्या नागरिकांना जाग आली. त्यांनी तातडीने सर्व कुटुंबीयासह इमारतीच्या बाहेर पडले. मात्र, दोघे जण इमारतीत होते. यावेळी ५.३० च्या सुमारास संपूर्ण इमारत कोसळली. यात दोघे जण अडकून पडले होते. दरम्यान, या बाबत अग्निशामक दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्य राबावण्यास सुरूवात केली. तसेच ढीगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढले.
प्रत्यक्षदर्शी आणि इमारतीतील लोकांनी देखील मदत कार्य राबवले. या बिल्डिंगला आधी हादरे बसले, त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले. मात्र, दोन नागरिक यामध्ये अडकले. या इमारतीत तब्बल २६ कुटुंब राहत असल्याची माहिती आहे. सर्वजण वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही इमारत अनधिकृत बांधकाम केलेली होती. पालिकेने ही इमारत रिकामी करण्याची देखील नोटीस बजावली होती. असे असेल तर येथील राहिवासी नागरिक इमारात सोडायला तयार नव्हते. मात्र, निकृष्ट कामामुळे अखेर ही इमारत कोसळली. या परिसरात अनेक बेकायदेशीर धोकादायक इमारती असून त्यांना तातडीने या इमारती रिकाम्या करून सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
या दुर्घटणेतील सुमारे ५० निवासींना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. २ लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. २ नागरिक दबले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एनडीआरएफची चमू लगेच घटनास्थळी पाचारण करण्यात आली. नवी मुंबई महापालिका आयुक्त घटनास्थळी दाखल. बाहेर काढलेल्या नागरिकांची महापालिकेच्या निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या