मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai local train accident : मुंबईत लोकल ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात महिला रुळावर पडली! जीव वाचला पण…

Mumbai local train accident : मुंबईत लोकल ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात महिला रुळावर पडली! जीव वाचला पण…

Jul 08, 2024 02:38 PM IST

Mumbai local accident : मुंबईत लोकल पकडतांना एक महिलेचा पाय घासरल्याने ती रुळावर पडली. यावेळी तिच्या पायावरून गाडी गेल्याने तिचे दोन्ही पाय कापले गेले आहे. या महिलेचा जीव वाचला असला तरी महिला ही अपंग झाली आहे. आज सकाळी ही घटना घडली.

मुंबईत लोकल पकडण्याच्या नादात महिला रुळावर पडली! जीव वाचला पण पाय कापले गेल्याने आले कायमचे अपंगत्व
मुंबईत लोकल पकडण्याच्या नादात महिला रुळावर पडली! जीव वाचला पण पाय कापले गेल्याने आले कायमचे अपंगत्व

Mumbai local accident : मुंबईत रविवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज देखील मुंबईत सकाळपासून पाऊस सुरू आहे. पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली आहे. सकाळपासूंन रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाली आहे. ज्या गाड्या सुरू आहेत त्यांना मोठी गर्दी आहे. या गर्दीमुळे पनवेल सीबीडी स्थानकादरम्यान, एक महिला लोकल पकडण्याच्या नादात पाय घसरून रुळावर पडल्याने तिच्या पायावरून लोकल गेल्याने दोन्ही पाय कापले गेले. या महिलेचा जीव वाचला असला तरी तिला कायमचे अपंगत्व आले आहे.

मुंबईत रात्रपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुले अनेक लोकल गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळ पासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने ठप्प झाल्या आहेत. पश्चिम रेल्वे देखील उशिराने धावत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या गर्दीतून एक महिलेने पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान पकडली. बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येताना या गाडीतून तिचा पाय घसरल्याने महिलेला ही रुळावर पडली. यावेळी या महिलेच्या अंगावरून रेल्वेचा पहिला महिला डब्बा गेला. या अपघातामुळे मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, स्थानकावरील रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने गाडी मागे घेऊन महिलेला दवाखान्यात भरती केले. या महिलेचे नाव समजू शकले नाही. या महिलेचा जीव वाचला असला तरी तिचे दोन्ही पाय या अपघातात कापले गेल्याने टी अपंग झाली आहे.

प्रवाशांची तारेवरची कसरत

मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे लोकलसेवा ठप्प झाल्याने प्रवासशांची तारांबळ उडाली आहे. स्थानकावर मोठी गर्दी उसळली आहे. कार्यालयात पोहोचण्यासाठी नागरिक धावपळ करत होते. बेलापूरवरून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे रेल्वे पकडण्यासाठी मोठी गर्दी प्रवाशांनी स्थानकावर केली आहे. या धावपळीतच महिला लोकलमधून खाली रुळावर पडून गंभीर जखमी झाली आहे.

बाहेर पडतांना काळजी घ्या!

मुंबईत पुढील काही तासांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सध्या मुंबईतील रेल्वेसेवा ठप्प झाल्याने ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पुढील काही तासांत मुंबईत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर