two Girls Crushed By Speeding Car : दुचाकी घसरून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईत रात्र पाळी करून घरी निघालेल्या दोन तरुणींचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. तरुणी दुचाकीवरून जात असताना त्यांना कारने धडक दिली. ही घटना सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास नवी मुंबईतील कोपरी येथील पामबीच मार्गावर घडली. दरम्यान, कार चालकाने तरुणींना उडवल्यानंतर त्यांना मदत न करता जखमी अवस्थेत ठेऊन पळ काढला. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असूनघटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संस्कृती खोकले (वय २२ रा. कामोठे) व अंजली पांडे (वय १९ रा. कोपरखैरणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुतींची नावे आहेत. या दोन तरुणी कॉल सेंटरवरून नाईट ड्युटी करूनघरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. यात एक युवती जागीच ठार झाली तर उपचार सुरू असताना दुसरीचा मृत्यू झाला.
संस्कृती अंजलीला बोनकोडे गावात सोडण्यास जात होती. बोनकोडे परिसरातील वीरशैव स्मशान भूमीजवळ आल्या असता समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. अपघात झाल्यावर कारचालक त्यांची मदत न करता निघून गेला. यात दुचाकीचालक संस्कृती जागीच ठार झाली तर अंजलीला स्थानिक लोकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर जखमी झालेल्या अंजलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राथमिक तापसानुसार मृत तरुणी विरुद्ध दिशेने स्कूटर चालवत असल्याचेसमोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
बोनकोडे गावाकडे जाणाऱ्या पाम बीच रोडवर स्कोडा कारने या तरुणींच्या स्कूटरला धडक दिली.मृत तरुणी एका खासगी कंपनीत कामाला होत्या. नाइट शिफ्ट करुन त्या घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. हा अपघात इतका भीषण होता की त्यांच्या स्कुटीचा चक्काचूर झाला व दोघींही हवेत उडून रस्त्यावर आपटल्या. या अपघातात मरण पावलेली संस्कृती कामोठे सेक्टर १८ मधील रहिवासी होती. तर,अंजली कोपरखैरणेमधील बोनकोडे गावात राहत होती. तुर्भे एमआयडीसीमध्ये दोघी एकाच कंपनीत कामाला होत्या.
संबंधित बातम्या