मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar Party Symbol: शरद पवार गटाला नवं चिन्ह; 'तुतारी' चिन्हावर निवडणूक लढवणार

Sharad Pawar Party Symbol: शरद पवार गटाला नवं चिन्ह; 'तुतारी' चिन्हावर निवडणूक लढवणार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 23, 2024 10:15 AM IST

Nationalist Congress Party- Sharad Chandra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार गटाला नवे चिन्ह मिळाले आहे.

Sharad Pawar Party Symbol
Sharad Pawar Party Symbol

Sharad Pawar Party Symbol: जेष्ठ नेते शरद पवार यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' या पक्षाला नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने 'तुतारी' हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केले आहे. शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली. शरद पवार गटाने वटवृक्ष हे चिन्ह मागितल्याची माहिती होती. पण निवडणूक आयोगाने तुतारीवाला माणूस हे चिन्ह दिले आहे.

 

"एक तुतारी द्या मज आणुनि

फुंकिन मी जी स्वप्राणाने

भेदुनि टाकिन सगळी गगने

दीर्घ जिच्या त्या किंकाळीने

अशी तुतारी द्या मजलागुनी!"

“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे”, अशा आशयाचे ट्विट शरद पवार गटाने केले आहे.

यापूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निर्देश येईपर्यंत शरद पवार गटाला तुतारी या चिन्हावर यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.

निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे नाव दिले . त्यानंतर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले आहे.

 

 

IPL_Entry_Point

विभाग