National Youth Festival in Nashik : यंदाचा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये रंगणार आहे. १२ ते १६ जानेवारी दरम्यान पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनासाठी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
१२ ते १६जानेवारी दरम्यान २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथे होणार आहे. या महोत्सवात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी १०० युवकांचे पथक चमू, राष्ट्रीय सेवा योजना, युवा स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटन, युवा स्वयंसेवक, असे सुमारे ८ हजार स्पर्धेक यात सहभागी होणार आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शासनाला देण्यात आली आहे. , युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे, यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे.
राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, यंदा राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्याची संघी महाराष्ट्राला मिळाली आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार असून हा महोत्सव यशस्वी करा.
नाशिक येथील तपोवन मैदानावर हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवांतर्गत सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये समुह लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व, छायाचित्र, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने आदींचा समावेश असणार आहे.
संबंधित बातम्या