मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील भुयारी मार्गाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचा हिरवा कंदील! २३५ झाडांचा जाणार बळी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील भुयारी मार्गाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचा हिरवा कंदील! २३५ झाडांचा जाणार बळी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 02, 2024 09:29 AM IST

twin tunnel under national park : मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठाणे ते बोरिवलीला जोडण्यासाठी कोर इको-सेन्सिटिव्ह झोन अंतर्गत भुयारी मार्ग करण्याच्या प्रस्तावाला नॅशनल बोर्ड फॉर वाइल्डलाइफने मंजुरी दिली आहे. यामुळे येथील २३५ झाडे तोडली जाणार आहेत.

National Wildlife Board clears twin tunnel under national park
National Wildlife Board clears twin tunnel under national park

National Wildlife Board clears twin tunnel under national park : मुंबई शहरातील दुर्मिळ जंगल असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून (SGNP) ठाणे ते बोरिवलीला जोडण्यासाठी कोअर झोनमधून भुयारी मार्ग करण्याच्या प्रस्तावाला नॅशनल बोर्ड फॉर वाइल्डलाइफने मंजुरी दिली आहे. यामुळे येथील २३५ झाडे तोडली जाणार आहेत. कापल्या जाणाऱ्या झाडांसाठी भरपाई देणाऱ्या वनीकरणाचे नियोजन करून या वर्षी काम सुरू केले होणार आहे. ३० जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत हा प्रस्थाव मंजूर करण्यात आला आहे.

Shivaji Park pool : हिरव्या पाण्यामुळे शिवाजी पार्क स्विमिंग पूल नागरिकांसाठी बंद

ठाणे ते बोरिवली जोडण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून दोन भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्थाव मंजूर करण्यात आले आहे. या प्रस्थावाला स्टेट बोर्ड फॉर वाइल्डलाइफची मंजूरी मिळणे बाकी होते. या संदर्भात ३० जानेवारी रोजी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत वाइल्डलाइफ बोर्डाने हा मार्ग करण्यास मंजूरी दिली आहे. दरम्यान, या कामामुळे येथील २३५ झाडे तोडली जाणार आहे. या पूर्वी देखील ऑक्टोबर२०२३ मध्ये, स्टेट बोर्ड फॉर वाइल्डलाइफ ने उद्यानाच्या कोर प्रदेशात माती परीक्षण परवानगी दिली होती, ज्यामध्ये १२२ झाडे बाधित झाली होती. या भुयारी मार्गासाठी उद्यानाच्या कोअर भागात खड्डा खोदण्यासाठी आणि मातीच्या स्तराची चाचणी करण्यासाठी ब्लास्टिंगला देखील परवानगी देण्यात आली होती. ठाण्यातील टिकुजीनी वाडी ते मुंबईतील बोरिवलीपर्यंत प्रत्येक बाजूला दोन लेन असलेल्या ट्विन-ट्यूब बोगदा या प्रकल्पात तयार केला जाणार आहे.

worli bandra sea link : वरळी-वांद्रे सीलिंकमध्ये दुचाकी घालून महिलेचा धुडगूस; पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना

बोरिवली-ठाणे बोगद्याला मंजुरी मिळाली असून आम्ही लवकरच याचे काम सुरू करू," असे एमएमआरडीएचे आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांनी सांगितले. "आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत आणि तोडल्या जाणाऱ्या झाडांसाठी भरपाई देणारे वनीकरण करण्यात येणार आहे. एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता एम पी सिंग यांनी या वर्षी काम सुरू होणार असल्याची माहिती दिली.

मात्र, वनविभागाच्या नियमांनुसार एकाच ठिकाणी तोडलेल्या झाडांची नुकसानभरपाई त्या ठिकाणी करावी लागत नाही. राष्ट्रीय उद्यानातील तोडल्या जाणाऱ्या झाडांसाठी नुकसान भरपाई देणारे वनीकरण हे औरंगाबादच्या फुलंब्री तहसीलमधील उमरावती गावात तब्बल ३५.३३ हेक्टर भूखंडावर करण्यात येणार आहे.

हा भुयारी मार्ग सुमारे ११.८ किमी लांबीचा आहे. एसजीएनपी आणि त्याच्या इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये हे बांधकाम केले जाणार आहे. मंजुरीसाठी सादर केलेल्या प्रस्तावानुसार या झोनमध्ये इतर संरक्षित क्षेत्रे तुंगारेश्वर राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यांपासून १५ किमीच्या हद्दीत असलेले जलकुंभ आणि लहान तलाव आहेत.

एमएमआरडीएने म्हटले आहे की राष्ट्रीय उद्यानाच्या सभोवतालच्या रस्त्यांवर पायाभूत सुविधा तयार करण्यात येत असल्याने या मार्गावर रहदारीचे प्रमाण वाढत आहे. रहदारी व्यतिरिक्त, राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूला मोठी मानवी वस्ती देखील वाढत असून यामुले संरक्षित क्षेत्राला बाधा निर्माण होत आहे. उद्यानाखालील भुयारी मार्ग हा यावरील प्रभावी उपाय ठरू शकतो. या बोगद्याच्या कामामुळे काही काळ येथील वन्यप्राण्यांना त्रास होऊ शकतो. मात्र, काम पूर्ण झाल्यावर त्यांना कोणताही त्रास होणार नाही.

WhatsApp channel

विभाग