National executive Body of NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. चार दिवसापूर्वी दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार (sharad Pawar) यांची अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड झाल्यानंतर आज राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली. शरद पवार यांनी आज पक्षातील कार्यसमिती सदस्य, स्थायी निमंत्रित, प्रदेशाध्यक्ष, आघाडीच्या संघटना, विभाग इत्यादींसह पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.
मुंबईत दाऊदशी संबंधित जमीन घोटाळ्यात आरोपी असलेल्या व सध्या तुरुंगात असणाऱ्या माजी मंत्री नवाब मलिक यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला आहे. विशेष म्हणजे घोटाळ्यात अडकल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिपदी कायम ठेवले होते. राष्ट्रवादीने माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी दिली आहे. आव्हाड यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मलिक आणि आव्हाड हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते होते. परंतु मलिक यांना काढून टाकण्यात आले आहे.
राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी खालीलप्रमाणे -
1. शरद पवार- अध्यक्ष
2. प्रफुल्ल पटेल - उपाध्यक्ष
3. सुनील तटकरे - राष्ट्रीय सरचिटणीस
4. योगानंद शास्त्री - राष्ट्रीय सरचिटणीस
5. के के शर्मा - राष्ट्रीय सरचिटणीस
6. पीपी मोहम्मद फैजल - राष्ट्रीय सरचिटणीस
7. नरेंद्र वर्मा - राष्ट्रीय सरचिटणीस
8. जितेंद्र आव्हाड- राष्ट्रीय सरचिटणीस
९. वाय पी त्रिवेदी - राष्ट्रीय कोषाध्यक्ष
10. एस आर कोहली - सचिव
राजीव झा, हेमंत टकले, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, राजेंद्र जैन यांची नियुक्ती राष्ट्रीय सचिव पदावर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीने नियुक्त केलेले प्रवक्ते -
नरेंद्र वर्मा यांची सरचिटणीस, राष्ट्रीय प्रवक्ते आणि प्रभारी माध्यम, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते, धीरज शर्मा यांची राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस व प्रवक्ते, सुश्री सोनिया दोहान यांची राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि प्रवक्त्या, सीमा मलिक यांची राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, राष्ट्रीय प्रवक्ते यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.