Nashik Murder: नाशिकच्या मनमाड जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली. मोबाईल चोरीच्या संशयावरून एका तरुणाला चक्क धावत्या रेल्वेतून खाली फेकून देण्यात आले. या घटनेत संबंधित तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मनमाड शहर पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित कुमार मुकेश गोस्वामी असे रेल्वेतून खाली फेकल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्य प्रदेशच्या चेनपूरा येथील रहिवाशी अजयकुमार साहूने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, "१५ फेब्रुवारी रोजी रात्री मनमाड रेल्वे स्थानकात पंजाब मेल रेल्वेगाडी उभी होती. त्यावेळी एका अनोखी व्यक्ती रोहितला मोबाईल चोरी केल्याच्या संशयावरून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत होता. त्यावेळी अजयकुमारने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता त्या व्यक्तीने त्यालाही शिवीगाळ केली. तसेच रोहितच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलाला रेल्वेखाली फेकतो अशी धमकी दिली. त्यानंतर रोहितला धावत्या रेल्वेतून खाली फेकून दिले."
याप्रकरणी मनमाड शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने गोस्वामी कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. तसेच याप्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी गोस्वामी कुटुंबातील सदस्य करीत आहेत.