मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik: नाशिकमध्ये पोलीस भरतीचा सराव करताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nashik: नाशिकमध्ये पोलीस भरतीचा सराव करताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Aug 05, 2023 06:20 PM IST

Nashik News: नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पोलीस भरतीचा सराव करताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Death (Representative Image)
Death (Representative Image)

Sinnar News: नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पोलीस भरतीचा सराव करताना तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (०४ ऑगस्ट २०२३) पहाटेच्या सुमारास मित्रांसोबत धावण्यासाठी गेलेल्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. यावेळी सोबतच्या मित्रांनी त्याला तत्काळ सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, भरत पोपट जाधव असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. भरत हा शुक्रवारी पहाटे त्याच्या मित्रांसोबत नेहमीप्रमाणे पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी गेला. मात्र, भरत धावत असताना त्याच्या छातीत दुखू लागले. यानंतर तो जमीनीवर कोसळला. यावेळी सोबतच्या मित्रांनी त्याला तत्काळ सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. पोलीस दलात भरतीचे स्वप्न घेऊन दररोज सरावाला जाणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली.

 

लोकप्रिय अभिनेत्री श्रुती षणमुग प्रियाच्या पतीचे निधन

दाक्षिणात्य छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती षणमुग प्रियाच्या पतीचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रुतीचा पती अरविंद शेखरने २ ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये अरविंद आणि श्रुतीने लग्न केले होते. त्याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

अरविंदच्या मृत्यूनंतर श्रुतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये “तू फक्त शरीराने दूर गेला आहेस, पण तुझा आत्मा आणि मन माझ्या सभोवताली आहे आणि सदैव माझे रक्षण करते! माझे तुझ्यावरचे प्रेम आता अधिकाधिक वाढत आहे. आपल्या एकमेकांसोबतच्या खूप आठवणी आहेत ज्या मी आयुष्यभर जपत राहीन. मला तुझी आठवण येते आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते अरविंद”, असे लिहिले आहे.

WhatsApp channel

विभाग