Nashik: १५ लाख दे, दंडाची रक्कम कमी करतो; लाच घेणाऱ्या तहसीलदाराला घडली जन्माची अद्दल!
Nashik Bribe: नाशकात १५ लाखांची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहात पकडल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे.
Nashik tahsildar bribe News: नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवारी, ०५ ऑगस्ट २०२३) मोठी कारवाई केली. दंडाची रक्कम कमी करण्यासाठी १५ लाखांची लाच घेणाऱ्या तहसीलदाराला रंगेहात पकडले. तक्रादाराच्या तक्रारीनंतर नाशिक लाचलुचपत विभागाने योजना आखून सापळा रचला. या प्रकरणाची नाशकात चांगलीच चर्चा रंगली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
नरेश कुमार बहिरम असे तहसीलदाराचे नाव आहे. नाशिक तालुक्यातील राजूर बहुला येथील जमिनीत मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी जवळपास एक कोटी रुपयांची दंड आकारणी केली. याविरोधात जमीन मालकाने थेट उपविभागीय कार्यालयात अपील दाखल केली. त्यावेळी या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी बहिरम यांनी जमीनीच्या मालकाकडे १५ लाखांची लाच मागितली.
नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम एक कोटी २५ लाख ६ हजार २२० रुपये दंड ठोठावण्यात आला. परंतु, सदर मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याच्या जमिनीच्या मालक यांनी स्पष्ट केले. जमीन मालकाने सांगितल्यानुसार याच्या पडताळणीसाठी संशयित बहिरम यांनी जमिनीच्या मालकांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षणसाठी बोलावले. एकदा झालेला आदेश फेरतपासणीसाठी घेण्यासाठी मागणी करण्यात आली. त्यावेळी बहिरम यांनी जमीनीच्या मालकाकडे १५ लाखांची मागणी केली.
सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. यानंतर तक्रारदाराने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर नाशिकच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून बहिरम यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
विभाग