Swine Flu : नाशिकमध्ये H1N1 व्हायरसचे थैमान! एकाच दिवशी दोघांचे मृत्यू, रुग्णसंख्या २८ वर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Swine Flu : नाशिकमध्ये H1N1 व्हायरसचे थैमान! एकाच दिवशी दोघांचे मृत्यू, रुग्णसंख्या २८ वर

Swine Flu : नाशिकमध्ये H1N1 व्हायरसचे थैमान! एकाच दिवशी दोघांचे मृत्यू, रुग्णसंख्या २८ वर

Published Jun 01, 2024 05:58 PM IST

Swine Flu Outbreak : नाशिक शहरात स्वाईन फ्लू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानेपालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. एकाच दिवशी दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर रुग्णसंख्या २८ वर पोहोचली आहे.

नाशिकमध्ये H1N1 व्हायरसचे थैमान
नाशिकमध्ये H1N1 व्हायरसचे थैमान

Swine Flu Outbreak in Nashik : नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. पावसाळ्यात उद्भवणारा हा आजार सध्या उष्णतेची लाट असतानाच पसरला आहे. त्यामुळे थंडी, ताप व खोखला आदि लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.  नाशिकमध्ये हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला असून स्वाईन फ्लूची लागण झालेल्या दोन रुग्णांचा एकाच दिवसात मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत २८ रुग्णांना याची लागण झाली आहे.

नाशिक शहरात स्वाईन फ्लू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने पालिकेची आरोग्य यंत्रणा  खडबडून जागी झाली आहे. गेल्या महिन्यात स्वाईन फ्ल्यूने दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा स्वाईन फ्लूने डोके वर काढल्याचं दिसत आहे.

काय आहे H1N1 व्हायरस?

सामान्य खोकला आणि सर्दीपासून सुरू होणारा H1N1 व्हायरस हा एक प्रकारचा इन्फ्लूएंझा विषाणू आहे. संसर्गजन्य असल्याने हा आजार अधिक लोकांना प्रभावित करतो. स्वाईन फ्लू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. २००९ मध्ये मानवांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे पहिल्यांदा दिसून आली. हा आजार जगभर पसरला आहे. WHO ने 2010 मध्ये H1H1 ला महामारी घोषित केले होते. 

स्वाइन फ्लू कशामुळे होतो?

स्वाइन फ्लू, ज्याला स्वाइन इन्फ्लूएन्झा असेही म्हणतात, त्याचा परिणाम डुकरांमध्ये तीव्र श्वसन रोग झाला, जो नंतर मानवांमध्ये फ्लूचा H1N1 प्रकार, ए इन्फ्लूएंझा व्हायरसमध्ये विकसित झाला. २००९ ते २०१० या काळात जागतिक उद्रेकासाठी स्वाइन फ्लू जबाबदार होता. २०१० मध्ये स्वाइन फ्लूमुळे भारतात अंदाजे १०१९३ प्रकरणे आणि १०३५ मृत्यू झाले.

स्वाइन फ्लूच्या विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित शिंकतो किंवा खोकतो तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो आणि विषाणू संभाव्यतः श्लेष्मल पृष्ठभागांपैकी एकामध्ये प्रवेश करतो.तसेच जेव्हा एखादी व्यक्ती विषाणूने संक्रमित झालेल्या एखाद्या गोष्टीला स्पर्श करते किंवा संपर्क करते किंवा संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या नाक,तोंड आणि आसपासच्या भागांना स्पर्श करते तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो. स्वाईन फ्लू हा आजाराच्या पहिल्या पाच दिवसात संसर्गजन्य असतो. लहान मुले आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण वाढू शकते.

स्वाईन फ्लूचे निदान व उपचार –

H1N1 लक्षणांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीने स्वतःला वेगळे केले पाहिजे आणि ताबडतोब जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, घरी स्वत:च औषधे घेणे टाळावे. स्वाइन फ्लू (H1N1) साठी सर्वात सामान्य आणि प्रमाणित स्क्रीनिंग चाचणी म्हणजे नासो-ओरोफरींजियल स्वॅब्सवर पॉलिमरेझ चेन रिएक्शन (PCR) चाचणी. तथापि, सावधगिरी बाळगणे आणि वेळेवर तपासणी केल्याने एखाद्याला लवकर बरे होण्यास मदत होऊ शकते. उपचार आणि औषधांपेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर