Saptashringi Devi : नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी मंदिर २४ तास राहणार खुले, मंदिर प्रशासनाचा निर्णय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Saptashringi Devi : नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी मंदिर २४ तास राहणार खुले, मंदिर प्रशासनाचा निर्णय

Saptashringi Devi : नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी मंदिर २४ तास राहणार खुले, मंदिर प्रशासनाचा निर्णय

Dec 30, 2024 11:07 PM IST

Saptashrungi Devi Mandir : सप्तशृंगगडावरील श्री भगवती मंदिर२९ डिसेंबरपासून२ जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलेराहणार आहे.

सप्तशृंगी देवी
सप्तशृंगी देवी

Saptashringi Devi Mandir : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची विविध मंदिरात गर्दी होत असते. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी मातेच्या मंदिर परिसरात देखील भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून देवीचे मंदिर रविवार (२९ डिसेंबर) पासून २ जानेवारीपर्यंत २४ तास खुले राहणार आहे. 

आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावरील श्री भगवती मंदिर २९ डिसेंबरपासून २ जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले राहणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतानिमित्त अनेक जण तीर्थक्षेत्राला जाणे पसंद करतात. उत्तर महाराष्ट्राची कुलदैवता असलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या सप्तशृंगडावर भाविकांबरोबरच पर्यटकांचीही दरवर्षी मोठी गर्दी पाहायला मिळते.

दरवर्षीप्रमाणे नव्या वर्षाची सुरुवात अनेक भाविक देवदर्शनाने करतात. श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे बाविकांची मोठी गर्दी असते. यावर्षीही नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर देवस्थानच्या वतीने येणाऱ्या भाविकांची गर्दी विभागली जावी आणि सर्वांना सहजतेने भगवती दर्शन घेता यावे यासाठी नुतन वर्ष प्रारंभास विविध राज्यातून येणाऱ्या भाविक-भक्तांसाठी श्री भगवती मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

यंदा २९ डिसेंबर रोजी रविवारची सुट्टी, ३० डिसेंबर (सोमवार) सोमवती अमावास्येमुळे मार्कंडेय ऋषी यात्रा, मंगळवारी वर्ष अखेर तर १ जानेवारीस नववर्षाच्या स्वागतासाठी गडावर भाविकांची गर्दी राहणार आहे. सलग सुट्यांमुळे राज्य व राज्याबाहेरील चाकरमानी लोक तीर्थाटन व पर्यटनासाठी बाहेर पडल्याने मंदिरात गर्दी वाढली आहे.

यामुळे दरवर्षाप्रमाणे यंदाही सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने नववर्षानिमित्त २९ डिसेंबरपासून २ जानेवारी रात्री नऊपर्यंत मंदिर सलग खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर