मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Protest: नाशिककरांचे मोठे हाल, सकाळपासून रिक्षा-टॅक्सी सेवा बंद!

Nashik Protest: नाशिककरांचे मोठे हाल, सकाळपासून रिक्षा-टॅक्सी सेवा बंद!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Sep 12, 2023 12:56 PM IST

Nashik rickshaw and taxi drivers Protest: नाशिकमध्ये आज सकाळपासून रिक्षा आणि टॅक्सी सेवा बंद असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

rickshaw
rickshaw

Nashik News: नाशिकमध्ये आज सकाळपासून रिक्षा आणि टॅक्सी सेवा बंद असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी चालकांनी विविध मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस आणि महापालिकेला निवेदन दिले होते. पंरतु, याची दखल घेतली जात नसल्यानं संतापलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आज सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नाशिक शहरातील रिक्षा, टॅक्सीचालक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. यामुळे आज सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत रिक्षा आणि टॅक्सी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय श्रमिक रिक्षा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलाय. शहरातील रिक्षा, टॅक्सीचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे, असे श्रमिक सेनेचे महानगरप्रमुख मामासाहेब राजवाडे यांनी म्हटलंय.

नाशिक शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या विविध मागण्यासाठी श्रमिक सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना २१ जुलै रोजी लेखी निवेदन दिलं होतं. या निवेदनाला जवळपास दोन महिने पूर्ण होत आले. मात्र, अद्यापही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाहीये. यामुळं शहरातील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलना सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात झाली असून ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे, अशी माहिती श्रमिक सेनेचे संस्थापक सुनील बागूल यांनी दिली. दरम्यान, रिक्षा-टॅक्सी चालकांच्या आंदोलनामुळं चाकरमान्यांना आणि विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.

रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रमुख मागण्या

- रिक्षा-टॅक्सी चालकांचा रोजगार हिरावणारी महापालिकेची सिटीलिंक सेवा थांबवण्यात यावी.

- शहरातील बेदकायदेशीर ओला, उबेर सेवा बंद करण्यात यावी.

- रिक्षा-टॅक्सी चालकांना शासनाकडून अनुदान देण्यात यावे.

WhatsApp channel

विभाग