नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिंडोरी येथे एका महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आपले जीवन संपवले. याप्रकरणी नाशिकच्या दिंडोरी पोलिसांनी महिलेचा पती, सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. अश्विनी अर्जुन मुळाणे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सिद्धेश अर्जुन मुळाणे आणि विराज अर्जुन मुळाणे अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे एका महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. या महिलेने दोन मुलांसह आपले जीवन संपवले आहे. या प्रकरणी महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी पोलिसात धाव घेत तिचा पती, सासू आणि दिराविरोधात तक्रार दाखल नोंदवली आहे. नातेवाईकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यातील धोंड गव्हाणवाडी गावातील चंद्रकांत नारायण पूरकर यांची कन्या अश्विनीचा विवाह २०१२ मध्ये खतवड येथील अर्जुन सुदाम मुळाणे या तरुणासोबत झाला होता. विवाहानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी अश्विनीच्या पतीसह सासरचे लोक तिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले. अश्विनीच्या आई-वडिलांनी वेळोवेळी पैसे देत वाद वाढू न देण्याचा प्रयत्न केला. मात्र अश्विनीचा नवरा अर्जुन सुदाम मुळाणे, सासू हिराबाई, दिर प्रमोद वेळोवेळी वारंवार पैशाची मागणी करत तिचा छळ करू लागले. तिला मारहाण करत होते.
पैशासाठी सासरची मंडळींकडून अश्विनीचा छळ सुरूच होता. याच छळाला कंटाळून अश्विनीने रविवारी टोकाचे पाऊल उचलले. अश्विनीने तिचा मोठा मुलगा सिद्धेश अर्जुन मुळाणे आणि छोटा मुलगा विराज अर्जुन मुळाणे यांच्यासह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. अश्विनी व दोन मुलांच्या आत्महत्येच्या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेप्रकरणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून १७ वर्षीय मुलीची अश्लील फोटो सोशल मीडियावर आणि तिच्या नातेवाईकांना पाठवल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या