Nashik News: नाशिक हादरले ! अंबड रोडवर भर रस्त्यात दोन तरुणांची हत्या, परिसरात तणाव
Nashik crime : नाशिक येथे अंबड रोडवरील संजीवनगर परिसरातील शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दोन युवकांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला असून दूसरा गंभीर जखमी झाला असून त्याचा देखील उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
नाशिक: नाशिक येथे अंबड रोडवरील संजीवनगर परिसरातील शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दोन युवकांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
ट्रेंडिंग न्यूज
Hawaii wildfires: अमेरिकेतील माउईच्या हवाई बेटावर जंगलात भीषण आग; ५६ नागरिक ठार; अनेक बेघर
मेराज खान (वय १८), इब्राईम शेख अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान, पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचा अंदाज आहे. नाशिकच्या अंबड लिंक रोडवर गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास संजीवनगर परिसरातील शिवनेरी चौकात मेराज खान आणि इब्राहीम शेख जात असतांना यावेळी दहा ते बारा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी त्यांच्यावर कोयता आणि दांडक्याने वार केल्याने मेराज खानचा जागीच मृत्यू झाला. तर तर इब्राईम शेख गंभीर जखमी झाला होता.
Nanded Honour Killing : ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड हादरलं! बापाने लेकीचा खून करत मृतदेह शेतात जाळला
त्याला येथील जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात हवण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान, त्याचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय असून पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर रात्री दाखल झाले होते.
दरम्यान, मृतांच्या नातेवाइकांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत दोघांचेही मृतदेह थेट रुग्णवाहिकेतून पोलीस आयुक्त कार्यालयात घेऊन गेले. यावेळी तणावाचे वातावरण होते. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घातल्यावर तणाव निवळला. दरम्यान, अंबड रोड परिसरात पोलिसांची शीघ्र कृती दलाचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विभाग