मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik news : त्र्यंबकेश्वरच्या बिल्व तीर्थ कुंडात कपडे धुण्यासाठी गेलेल्या २ मुलींचा बुडून मृत्यू

Nashik news : त्र्यंबकेश्वरच्या बिल्व तीर्थ कुंडात कपडे धुण्यासाठी गेलेल्या २ मुलींचा बुडून मृत्यू

Jun 08, 2024 08:30 PM IST

Nashik News : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे कपडे धुण्यासाठी बिल्व तीर्थ कुंडात गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. एका मुलगी पाय घसरून पडली. तिला वाचवताना दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला.

बिल्व तीर्थ कुंडात कपडे धुण्यासाठी गेलेल्या २ मुलींचा बुडून मृत्यू
बिल्व तीर्थ कुंडात कपडे धुण्यासाठी गेलेल्या २ मुलींचा बुडून मृत्यू

नाशिक जिल्ह्यात आणखी एक बुडून मृत्यू झाला आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे कपडे धुण्यासाठी बिल्व तीर्थ कुंडात गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. एका मुलगी पाय घसरून पडली. तिला वाचवताना दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे त्र्यंबकसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना वाढल्याचे दिसत आहे.बिल तीर्थ तलावातील गाळ व मुरूम काढून याची खोली वाढवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तनुजा युवराज कोरडे (वय १३) आणि अर्चना बाळू धनगर (वय १३) असे मृत्यू झालेल्या दोन्ही मुलींची नावे आहेत. या दोघी बिल्व तीर्थ तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुताना अर्चना पाय घसरून पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी तनुजा गेली असता ती देखील पाण्यात बुडाली. यावेळी मुली कपडे धुतांना दिसत नसल्याने परिसरातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. नागरिकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

सध्या त्र्यंबक शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नगरपरिषदेकडून शहरात तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे.

शनिवारी दुपारच्या त्र्यंबकेश्वर शहरातील १३ वर्ष वयाच्या दोन मुली बिल्व तीर्थ तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असताना एका मुलगी पाय घसरून कुंडातील पाण्यात पडली. हे पाहून तिच्यासोबत असलेल्या मुलीने तिला वाचवण्यासाठी कुंडात उडी मारली. दुपारच्या सुमारास तेथे कोणीही नसल्याने दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे त्र्यंबकेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पाण्यासाठी लोक जीव धोक्यात घालत आहेत. पाणी टंचाईने या दोघींचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

बिल्व तीर्थावर याआधीही मृत्यूच्या घटना

दरम्यान, यापूर्वी देखील बिल्व तीर्थवर अपघाती मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने या तलावाकडे योग्य ती प्रतिबंधक उपाययोजना करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास कोरडे यांनी केली आहे. तर सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये दोन दिवसाआड पाणी (Water) येत असल्याने येथील लोकांना पुरेसे पिण्याचे पाणी देखील मिळत नाही. त्यामुळे पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही मग वापरण्यासाठी कुठून आणणार? असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.

दरम्यान, याआधीही बिल्व कुंडात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने याबाबत प्रतिबंधक उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग