मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik News : नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी रेड! तब्बल ५०० कोटींचे घबाड लागले हाती; पैसे मोजून अधिकारीही थकले

Nashik News : नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी रेड! तब्बल ५०० कोटींचे घबाड लागले हाती; पैसे मोजून अधिकारीही थकले

May 26, 2024 10:51 AM IST

Nashik Income Tax Department raid : नाशिकमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल ५०० कोटी रुपयांचे घबाड अधिकाऱ्यांच्या हाती लागले असून यात २६ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल ५०० कोटी रुपयांचे घबाड अधिकाऱ्यांच्या हाती लागले असून यात २६ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल ५०० कोटी रुपयांचे घबाड अधिकाऱ्यांच्या हाती लागले असून यात २६ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Nashik Income Tax Department raid : नाशिकमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. या छापेमारीत कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली होती. येथील एका सराफा व्यावसायिकावर ही धाड टाकण्यात आली हे. एका खोलीत तब्बल २६ कोटी रुपयांची रोकड सापडली असून ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहे. एकूण ५०० कोटी रुपयांचे घबाड अधिकाऱ्यांना सापडले आहेत. तब्बल ३० तास ही कारवाई चालली.

ट्रेंडिंग न्यूज

Delhi Hospital Fire : दिल्लीत मुलांच्या रुग्णालयात अग्नितांडव! ७ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

नाशिक, नागपूर आणि जळगावच्या अधिकाऱ्यांनी नाशिक येथील ५० अधिकाऱ्यांनी एकाच वेळी ही कारवाई केली आहे. एका सराफा व्यावसायिकावर ही कारवाई केली आहे. तपास पथकाला २६ कोटी रुपयांची रोख सापडली आहे. ही रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल १४ तास लागले आहेत. ही रोकड नेण्याकरता ७ कार लागल्याची माहिती समोर आली आहे. सलग ३० तास आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. नाशकात सराफा व्यावसायिकाकडे कोट्यावधींची रोकड आणि बेहिशोबी मालमत्ता सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही रोकड फर्निचरमध्ये लपवण्यात आली होती.

jejuri khandoba temple : श्री क्षेत्र जेजुरी गडावर खंडेरायाला आकर्षक फुलांची सजावट; पुष्पोत्सवाने सजला गाभारा; पाहा फोटो

सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापासत्र सुरू केले होते. त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यातदेखील अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकत महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहे. कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सची तपासणी करण्यात आली आहे. मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही छापे टाकण्यात आले आहे.

मोठ्या कारवाईने नाशिकमध्ये खळबळ

नाशिक शहरात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांत तणावाचे वातावरण आहे. आयकर विभागाने १३ मे रोजी नांदेड शहरातही कारवाई केली होती. या कारवाईत १७० कोटीची रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली होती. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, परभणी या शहरांतील आयकर विभागाच्या कारवाई बोलवण्यात आले होते.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग