मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुलांच्या निधनाचे वृत्त ऐकताच आईनेही घेतला जगाचा निरोप, एकाचवेळी माय-लेकावर अंत्यसंस्काराने अख्खा गाव गहिवरला

मुलांच्या निधनाचे वृत्त ऐकताच आईनेही घेतला जगाचा निरोप, एकाचवेळी माय-लेकावर अंत्यसंस्काराने अख्खा गाव गहिवरला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 02, 2023 07:20 PM IST

Nashiknews : सिन्नरतालुक्यातील निऱ्हाळे-फत्तेपुर गावातील सांगळे कुटुंबावर दुहेरी आघात झाला. नवी मुंबईयेथे राहणाऱ्या मुलाचे निधन झाल्याची वार्ता समजताच गावी असणाऱ्या आईला हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Nashik news
Nashik news

मुलाला काही झालं तर आईच्या काळजाला चैन पडत नाही. शेवटी आईचंच काळीज ते.. प्रत्येक संकटात हाताचा पाळणा करत आई मुलाचे रक्षण करत असते. जगात सर्वात मोठे दु:ख कोणतं असेल तर अवेळी मुलगा जग सोडून जाणे. आईसारखं दुःख कुणालाच होत नाही. अशीच हृदयद्रावक घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये घडली आहे. शिवराम फकिरबा सांगळे व ठकूबाई फकिरबा सांगळे अशी मृतांची नावे आहेत.

सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे-फत्तेपुर गावातील सांगळे कुटुंबावर दुहेरी आघात झाला. नवी मुंबई येथे राहणाऱ्या मुलाचे निधन झाल्याची वार्ता समजताच गावी असणाऱ्या आईला हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

नाशिकमध्ये दोन दिवसापूर्वी आधुनिक हिरकणीची बातमी समोर आली होती. या आईने आपल्या घरात अडकलेल्या बाळासाठी जीव धोक्यात घालून शेजारच्या घराच्या गॅलरीतून आपल्या घराच्या गॅलरीत उडी मारून बाळापर्यंत पोहचली होती. दोन दिवसानंतर सिन्नरमध्येही अशाच प्रकारे आईच्या ममतेची प्रचिती आली आहे. निर्हाळे फत्तेपूर गावातील रहिवासी शिवराम फकिरबा सांगळे नवी मुंबईत राहायला होते. 

सांगळे मुंबई शिक्षण निरीक्षक विभागातून चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना लकवा मारला होता. बुधवारी सकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे नातेवाईक मृतदेह गावी आणत असताना ही वार्ता त्यांच्या आईच्या कानावर पडली. त्यानंतर आई ठकुबाई यांना काही वेळातच हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योती मालवली. 

सकाळच्या सुमारास शिवराम सांगळे यांचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव शरीर गावाकडे आणले जात होते. मात्र ही वार्ता त्यांच्या ९५ वर्षीय आईला सांगितली नव्हती. मात्र, घराकडे येणारे नातेवाईक आणि काही उपस्थितांना रडू न आवरल्याने ही वार्ता ठकूबाई यांना समजली व त्यांनी मुलाबरोबर या जगाचा निरोप घेतला.

दरम्यान शिवराम यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच आईच्या रुपात सांगळे कुटूंबार दुसरा डोंगर कोसळला. आई आणि मुलगा यांच्या एकाच दिवशी झालेल्या निधनाने नातेवाईक आणि ग्रामस्थांवर शोककळा पसरली होती. दोन वर्षांपूर्वी शिवराम यांचा छोटा भाऊ प्रदीप याचेही हृदयविकाराने निधन झालेले आहे. आता आई आणि मुलाचे एकाच दिवशी निधन झाल्याने संपूर्ण गावा हळहळत आहे.

IPL_Entry_Point

विभाग