नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिन्यात कुटूंबातील ४ सदस्यांचा मृत्यू झाल्यास एक हसते खेळते कुटूंब संपले आहे. ९ वर्षीय मुलीचा अजारपणामुळे मृत्यू झाला. याचा आईला मोठा धक्का बसला व तिच्या तेराव्याला तिनेही जीव सोडला. या दोघींच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप-लेकावरही काळाने घाला घातला. राहत्या घरात बाप-लेकाचा मृतदेह आढळून आल्याने हे चौकोनी कुटूंब संपले आहे. या घटनेने नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे कुटूंब पाथर्डी फाटा परिसरातील वासननगर येथे रहात होतं. महाजन कुटुंब काळाच्या पडड्याआड गेलं आहे. सुखी कुटुंबाच्या या करुण अंतामुळे प्रत्येकाकडून हळहळ व्यक्त केले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार तुषार महाजन हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील हिंगोना गावचे रहिवाशी होते. कामानिमित्त हे कुटूंब गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून नाशिकच्या पाथर्डीफाटा येथील वासननगर येथे रहात होते. तुषार महाजन यांच्या पत्नीचे नाव स्वाती महाजन आहे. त्यांना १३ वर्षाच्या एक मुलगा कार्तिक तर ९ वर्षाची मुलगी हर्षदा होती. हर्षदाला काही दिवसांपासून ताप येत होता. हा ताप तिच्या मेंदूपर्यंत पोहोचल्याने तिची प्रकृती खालावली होती. तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.
मात्र मे महिन्यात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हसत्या खेळत्या चिमुकल्या मुलीचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याचे आई स्वातीला पाहावले नाही. त्यांना या धक्का बसला होता. मुलीच्या मृत्यूनंतर त्यांना खाणे पिणे सोडले होते. तिचा तेरवीचा विधी होत असतानाच आईची तब्बेत बिघडली. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांनीही जगाचा निरोप घेतला.
१५ दिवसात मुलगी व पत्नीच्या मृत्यूने तुषार महाजन याना मोठा धक्का बसला होता. या डोंगराएवढ्या धक्क्यातून सावरण्यासाठी या बाप-लेकांना नातेवाईकांनी खूप धीर देण्याचा प्रयत्न केला. या दु:खातून बाहेर पडून स्वत:ला सावरा, मुलाकडे लक्ष द्या, अशी विनवणी सर्वांनी केली. मात्र मुलगी व पत्नी गेल्याचा आघात त्यांच्या मनावर खोलवर गेला होता. दोन दिवसापूर्वू दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक शरमाळे आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तुषार आणि कार्तिकने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या