नाशिकमधील २५ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा; शिक्षिकेने विद्यार्थ्यांना सुपारी देऊन प्रियकराला संपवलं-nashik murder case teacher killed her boyfriend with help of students ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नाशिकमधील २५ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा; शिक्षिकेने विद्यार्थ्यांना सुपारी देऊन प्रियकराला संपवलं

नाशिकमधील २५ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा; शिक्षिकेने विद्यार्थ्यांना सुपारी देऊन प्रियकराला संपवलं

Aug 21, 2024 08:51 PM IST

Nashikmurder case : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून शिक्षिका असलेल्या प्रेयसीने तिच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने एका टोळीशी संपर्क केला. त्यांना २लाख रुपयांची सुपारी देत बॉयफ्रेंडचा कायमचा काटा काढला.

नाशिकमधील २५ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा
नाशिकमधील २५ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

नाशिकच्या पंचवटी भागात २५ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. पंजाबराव देशमुख वसतीगृहासमोर बुधवारी पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गगन कोकाटे (वय २५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. मृत तरुण सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचा मुलगा होता. आर्थिक देवाण घेवाणीतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदात होता. मात्र पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गगन कोकाटे याचा त्याच्या प्रेयसीकडूनच काटा काढण्यात आलेल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत गगन कोकाटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झालेल्या प्रविण शहाजी कोकाटे यांचा मुलगा आहे. गगनचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या  ३९   वर्षीय शिक्षिकेसोबत प्रेम संबंध होते. मात्र गगन या महिलेला त्रास देत होता, असे सांगितले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून गगन त्या महिलेला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून शिक्षिका असलेल्या प्रेयसीने तिच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने एका टोळीशी संपर्क केला. त्यांना २ लाख रुपयांची सुपारी देत गगनचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गगनची आज पहाटे हत्या घडवून आणली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली असून त्यातील २ आरोपी अल्पवयीन आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

गगन व आरोपी शिक्षिका शेजारी रहात होते. ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यानंतर गगन महिलेला त्रास देत ब्लॅकमेल करत होता. याला कंटाळून महिलेने २ लाखांची सुपारी देत त्याला कायमचे संपवले. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

कोलकाता आरोपीच्या सासूने सांगितल्या जावयाच्या हिंसक कथा -

आरोपीची  सासू दुर्गा देवी यांनी म्हटले की, रॉययांनी एकट्याने हे कृत्य केले नसावे, अशी शंका व्यक्त करत या गुन्ह्यात आणखी व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दुर्गा देवी यांनी आपल्या मुलीचे संजय रॉय यांच्याशी झालेले बिघडलेले वैवाहिक जीवन सांगितले. दुर्गा देवी म्हणाल्या, "माझे आणि त्यांचे संबंध खूप तणावपूर्ण होते, सुरुवातीला ६ महिने सर्व काही चांगले होते. जेव्हा माझी मुलगी ३ महिन्यांची गरोदर होती, तेव्हा त्याने गर्भपात केला. त्याने तिला मारहाण केली आणि याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर माझी मुलगी आजारी राहिली, तिचा औषधांचा सर्व खर्च मी उचलला.

 

विभाग