Nashik-Mumbai Highway Accident: नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटाजवळ (kasara ghat) एका कंटेनरने अनेक गाड्यांना धडक दिली. या अपघातात जवळपास ६ ते ७ गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान या अपघातात १० ते १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता.
कसारा घाटात ब्रेक फेल झालेल्या कंटेनर गाडीने ६ ते ७ वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत गाड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. या अपघातात १२ ते १५ जण जखमी झाले आहेत. अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर कंटेनर हा महामार्गालगत असलेल्या नाल्यात जाऊन पलटी झाला. घटनास्थळावर महामार्ग पोलीस केंद्र घोटी, रूट पेट्रोलिंग टीम आणि रुग्णवाहिका आणि जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका रवाना झाली आहे. तर आज रविवारी असल्याने कसारा घाटात वाहनांची रांग लागली आहे. त्यातच हा अपघात झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कसारा घाटातील ब्रेक फेल पाँईटजवळ एका कंटेनरने सहा ते सात गाड्यांना धडक दिली. या धडकेत ५ गाड्यांचा चुराडा झाला आहे.
अमरावती जिल्ह्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. आज शहरातील प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या भरधाव सीटीबसने रस्त्यावरून जाणाऱ्या चौघांना चिरडले. या भीषण अपघातात ९ वर्षीय मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने या बसची तोडफोड केली. नागरिकांचा संताप पाहता सायन्सकोर मैदानासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.प्रीतम हा बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर आजी व दोन नाती या गंभीर जखमी झाल्या.
संबंधित बातम्या